जाहिरात
मराठी बातम्या / विदेश / Coronavirus हवेतून पसरू शकतो? अखेर WHO नेही घेतली पुराव्यांची दखल

Coronavirus हवेतून पसरू शकतो? अखेर WHO नेही घेतली पुराव्यांची दखल

कोरोना विषाणूच्या संक्रमण पसरत असताना सात महिन्यांचा कालावधी उलटला आहे. यादरम्यान जागतिक आरोग्य संघटनेच्या कमिटीने तीन वेळा याच्या मूल्यांकनाबाबत चर्चेसाठी बैठकीचं आयोजन केलं आहे.

कोरोना विषाणूच्या संक्रमण पसरत असताना सात महिन्यांचा कालावधी उलटला आहे. यादरम्यान जागतिक आरोग्य संघटनेच्या कमिटीने तीन वेळा याच्या मूल्यांकनाबाबत चर्चेसाठी बैठकीचं आयोजन केलं आहे.

Coronavius हा हवेतून पसरणारा (Airborne) विषाणू असल्याचे काही पुरावे संशोधकांनी सादर केले होते.

  • -MIN READ
  • Last Updated :

जीनिव्हा, 7 जुलै : Coronavius हा हवेतून पसरणारा (Airborne) विषाणू असल्याचे काही पुरावे संशोधकांनी सादर केले होते. तेव्हापासून आता हा विषाणू अधिक धोकादायक ठरणार का, याविषयी चर्चा सुरू आहे. पण इतके दिवस जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) हा दावा फेटाळला होता. मंगळवारी प्रथमच WHO ने हा हवेतून पसरणारा विषाणू असल्याचे काही पुरावे सादर झाले असल्याचं मान्य केलं. हा विषाणू हवेतून संसर्ग पसरवू शकतो, याविषयीचे काही पुरावे असतील, तर त्याची दखल घ्यायला आम्ही तयार आहोत, असं संघटनेचे तज्ज्ञ बेन्डेटा अलेग्रांझी यांनी मंगळवारी सांगितलं. जगातल्या 32 देशांच्या 239 शास्त्रज्ञांनी यासंर्भात WHOला पत्र लिहिलं आहे. या नव्या अभ्यासामुळे बाधित व्यक्तिंपासून किती दूर राहायचे काय काळजी घ्यायची याचे निकषही बदलण्याची शक्यता आहे, असं शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे. आतापर्यंत कोरोनाव्हायरस (coronavirus) हा संक्रमित व्यक्ती शिंकल्यानंतर, खोकल्यानंतर त्याच्या तोंडातून निघणाऱ्या थेंबाशी इतर व्यक्तींचा संपर्क आला किंवा हे थेंब पडलेल्या पृष्ठभागाशी संपर्क आला तर कोरोनाव्हायरसची लागण होते, हे आपणा सर्वांना माहितीच आहे. VIDEO: ‘कोरोना’विरुद्धच्या लढाईत आता Robot ‘गोलर’ची मदत, रुग्णांना देणार औषधं कोरोनाव्हायरस असाच पसरतो आहे, हे जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितलं आहे. मात्र एका संशोधनानुसार कोरोनाव्हायरस हा हवेतूनही (airborne coronavirus) पसरू शकतो, असं शास्त्रज्ञांनी सांगितलं आहे. त्यामुळे आता चिंता अधिक वाढली आहे. पुणे जिल्ह्यात महत्वाची बँकच झाली कोरोनाची HOT SPOT, 10 जणांना बाधा अ‍ॅरोसोल हे लहान आहेत त्यामुळे ड्रॉपलेट्सच्या तुलनेत त्यांच्यामध्ये व्हायरस कमी असावेत. मात्र ते हलके असतात त्यामुळे हवेत कित्येक तास राहू शकतात. एखाद्या व्यक्तीमध्ये कोरोनाची लक्षणं दिसत नसली तरी ती व्यक्ती बोलताना, श्वासोच्छवास करताना हवेत हा व्हायरस जाऊ शकतो आणि हवेत राहू शकतो. अशावेळी हवा खेळती ताजी नसेल तर हा व्हायरस पसरू शकतो आणि एका संक्रमित व्यक्तीमुळे कित्येकांना याची लागण होऊ शकते. ती व्यक्ती सुपरस्प्रेडर ठरू शकते, असं शास्त्रज्ञ म्हणाले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात