पुणे 7 जुलै: जिल्ह्यातील अग्रगन्य असणा-या राजगुरुनगर सहकारी बँकेतील 2 शाखांमधील 8 कर्मचारी आणि 2 संचालक असे एकूण 10 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे राजगुरूनगर सहकारी बँक कोरोनाची हॉट स्पॉट झाली आहे. 19 जून रोजी राजगुरूनगर येथील नवीन वास्तुच्या उदघाटना दरम्यान मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिति होती त्यावेळी सोशल डिस्टन्सिंग, मास्क न वापरणे अशी घटना घडली होती त्यातुनच कोरोनाची लागण झाल्याचेही बोलले जात आहे आहे. ग्रामिण भागात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असताना अत्यावश्यक सेवा देत असलेली पुणे जिल्ह्यातील अग्रगन्य असणारी राजगुरुनगर सहकारी बँकेतील दोन शाखांच्या दहा कर्मचा-यांना कोरोनाची लागण झाली असुन दोन शाखा बंद करण्यात आल्या आहेत. तर मंचर व नारायणराव परिसर कंन्टेमेंट झोन करण्यात आल्याने राजगुरुनगर सहकारी बँकेच्या मंचर व नारायणगाव शाखा पुढील आदेश येई पर्यत बंद ठेवण्यात येणार आहे. पुण्यात हॉटेल्स आणि लॉज बंदच राहणार, कोरोनाच्या उद्रेकामुळे PMCचा निर्णय पुणे,पिंपरी चिंचवड,व पुण्याच्या ग्रामीण भागात 17 शाखांच्या माध्यमातुन सेवा दिली जाते सध्याच्या कोरोनाच्या महामारीच्या काळात कर्मचारी सेवा देत आहे मात्र हि सेवा देत असताना पाईट व राजगुरुनगर येथील बँकेच्या 10 कर्मचा-यांना कोरोनाची लागण झाली आहे त्यामुळे सर्वत्र भितीचे वातावरण पसरले आहे. VIDEO: ‘कोरोना’विरुद्धच्या लढाईत आता Robot ‘गोलर’ची मदत, रुग्णांना देणार औषधं बँकेच्या 10 कर्मचा-यांना कोरोनाची लागण झाल्याने त्या कर्मचा-यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी स्वतःहुन पुढे येऊन आपली कोरोना तपासणी करुन घ्यावी असे आवाहन बँकेच्या वतीने अध्यक्ष गणेश थीगळे यांनी केले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.