मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /मुंबईत ‘कोरोना’विरुद्धच्या लढाईत आता Robot ‘गोलर’ची मदत, रुग्णांना देणार औषधं, पाहा VIDEO

मुंबईत ‘कोरोना’विरुद्धच्या लढाईत आता Robot ‘गोलर’ची मदत, रुग्णांना देणार औषधं, पाहा VIDEO

यामुळे वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे कोविड पॉझिटिव्ह व्यक्तींसोबत संपर्क कमी होणार असल्याने जोखीम कमी होणार आहे.

यामुळे वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे कोविड पॉझिटिव्ह व्यक्तींसोबत संपर्क कमी होणार असल्याने जोखीम कमी होणार आहे.

यामुळे वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे कोविड पॉझिटिव्ह व्यक्तींसोबत संपर्क कमी होणार असल्याने जोखीम कमी होणार आहे.

विनया देशपांडे,  मुंबई 7 जुलै:  मुंबई कोरोना व्हायरस विरुद्ध डॉक्टर्स निकराची लढाई लढत आहेत. शहरात दररोज आकडा वाढत असल्याने रुग्णसंख्येत प्रचंड वाढ झाली आहे. डॉक्टर्स आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांची सेवा देतांना दमछाक होत आहे. त्यात मदत व्हावी यासाठी आता Robotची मदत घेतली जाणार आहे. कोरोना रुग्णांना अन्न,पाणी व औषधे रुग्णांपर्यंत पोहोचवण्याचे काम ‘गोलर’ हा रोबोट करणार आहे. मुंबईच्या पोद्दार रुग्णालयात हा गोलर आता काम करणार आहे.

कोरोनाविरुद्धच्या लढाईत हे महत्त्वाचे पाऊल मानलं जातं. यामुळे वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे कोविड पॉझिटिव्ह व्यक्तींसोबत संपर्क कमी होणार असल्याने जोखीम कमी होणार आहे. रुग्णांना गोळ्या, औषधं आणि जेवणं देणं ही आवश्यक कामं आहेत. त्याचबरोबर जोखमीचीही आहेत. त्यामुळे अनेक डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांना बाधा झाली आहे.

आता रोबोटची मदत घेतल्यास ही जोखीम कमी होणार असून कामही वेगात होण्यास मदत होणार आहे.

राज्यात गेले काही दिवस 6000 वर कोरोना रुग्णांची दररोज भर पडत होती. त्यामध्ये आज किंचित घट झाली. गेल्या 24 तासांमध्ये राज्यात 5134 रुग्ण आढळून आलेत. तर 224 जणांचा मृत्यू झाला. पण दिवसभरात डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्याही मोठी आहे. 3296 रुग्णांना बरं होऊन घरी सोडण्यात आलं. राज्यातल्या एकूण रुग्णांची संख्या 2,17,121 एवढी झाली आहे. तर मृत्यूचा आकडा 9250 वर गेला आहे.

Unlock नंतर Corona रुग्णांच्या संख्येत तिपटीने वाढ झाली आहे. पण मृत्यूदर फारसा वाढलेला नाही.

First published:
top videos

    Tags: Robot