Home /News /videsh /

आता हवेतून पसरणाऱ्या कोरोनाला घाबरायची गरज नाही, शास्त्रज्ञांनी आणला खास 'फिल्टर'

आता हवेतून पसरणाऱ्या कोरोनाला घाबरायची गरज नाही, शास्त्रज्ञांनी आणला खास 'फिल्टर'

सर्दी सोबतच खोकलाही पावसाळ्यात होत असतो. त्यामुळे खोकला झाल्यानंतर साध्या औषधांवर तो अंगावर काढू नका.

सर्दी सोबतच खोकलाही पावसाळ्यात होत असतो. त्यामुळे खोकला झाल्यानंतर साध्या औषधांवर तो अंगावर काढू नका.

एका संशोधनानुसार कोरोनाव्हायरस हा हवेतूनही (airborne coronavirus) पसरू शकतो, असं शास्त्रज्ञांनी सांगितलं आहे. त्यामुळे आता चिंता अधिक वाढली आहे.

    हॉस्टन, 08 जुलै : आतापर्यंत कोरोनाव्हायरस (coronavirus) हा संक्रमित व्यक्ती शिंकल्यानंतर, खोकल्यानंतर त्याच्या तोंडातून निघणाऱ्या थेंबाशी इतर व्यक्तींचा संपर्क तर पसरतो, हे सर्वांना ठावूक आहे. मात्र आता कोरोना एका संशोधनानुसार कोरोनाव्हायरस हा हवेतूनही (airborne coronavirus) पसरू शकतो, असं शास्त्रज्ञांनी सांगितलं आहे. त्यामुळे आता चिंता अधिक वाढली आहे. मात्र शास्त्रज्ञांनी आता यावरही हे मार्ग काढला आहे. शास्त्रज्ञांनी असा दावा केला आहे की, एक असा एअर फिल्टर (Novel air filter) तयार करण्यात आला आहे जो हवेतील विषाणूला मारण्यास सक्षम असेल. शास्त्रज्ञांना तयार केलेला हा फिल्टर शाळा, रुग्णालये आणि विमानांसारख्या बंद ठिकाणी कोरोनाचा फैलाव रोखू शकतो. वाचा-हवेतूनही पसरू शकतो कोरोना; कसा कराल स्वत:चा बचाव मटेरियल टुडे फिजिक्स या जर्नलमध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार या 'एअर फिल्टर' मधून जाणारी हवा 99.8% नोवल कोरोना व्हायरसचा नाश करू शकते. या अभ्यासामध्ये असे म्हटले आहे की हे उपकरण व्यावसायिकपणे उपलब्ध निकेल फोमला 200 डिग्री सेल्सियस गरम करून तयार केले गेला होते. सार्वजनिक ठिकाणी धोका टळणार यूएस युनिव्हर्सिटी ऑफ ह्युस्टनचे (यूएच) अभ्यासक झिफेंग रेन यांनी सांगितले की, “हा फिल्टर विमानतळ आणि विमानांमध्ये कोव्हिड-19 चा प्रसार रोखण्यासाठी उपयुक्त ठरू शकेल. त्याचबरोबर ऑफिस, शाळा आणि सार्वजनिक ठिकाणीही याचा फायदा होईल. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, कोरोना सुमारे तीन तास हवेमध्ये राहू शकतो, म्हणून लवकरच या फिल्टरचा वापर केला पाहिजे. रेन असेही म्हणाले की, निकेल फोम महत्त्वाचे आहे. वाचा-Coronavirus हवेतून पसरू शकतो? अखेर WHO नेही घेतली पुराव्यांची दखल हवेतून पसरणाऱ्या कोरोनाव्हायरसचा धोका कसा टाळाल? शास्त्रज्ञांनी सांगितल्यानुसार, सोशल डिस्टन्सिंग हे महत्त्वाचं आहेच. कारण संक्रमित व्यक्ती जितकी तुमच्या जवळ असेल तितक्या त्याच्या अ‍ॅरोसोलमार्फत व्हायरस पसरण्याचा धोका जास्त. तसंच हात धुण्याप्रमाणे घरातील हवादेखील खेळती असावी. म्हणजे व्हेंटिलेशन योग्य असावं. मास्क वापरण्यावर अधिक भर द्यायला हवा. आरोग्य कर्मचाऱ्यांनी N95 मास्क वापरणंच गरजेचं आहे, ज्यामध्ये अ‍ॅरोसोल फिल्टर करण्याची क्षमता असते. विशेषत: काही वैद्यकीय प्रक्रिया अशा असतात ज्यावेळी डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी अ‍ॅरोसोलच्या संपर्कात येतात. त्यावेळी या मास्कचा वापर करावाच. वाचा-‘या’ देशात आढळलं माणसाच्या उंचीएवढं वटवाघूळ? PHOTO बघून बसेल धक्का
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    पुढील बातम्या