हवेतूनही पसरू शकतो कोरोना; कसा कराल स्वत:चा बचाव

हवेतूनही पसरू शकतो कोरोना; कसा कराल स्वत:चा बचाव

कोरोनाव्हायरस हा हवेतूनही पसरू शकतो, अशी शक्यता शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे.

  • Share this:

मुंबई, 08 जुलै : आतापर्यंत कोरोनाव्हायरस (coronavirus) हा संक्रमित व्यक्ती शिंकल्यानंतर, खोकल्यानंतर त्याच्या तोंडातून निघणाऱ्या थेंबाशी इतर व्यक्तींचा संपर्क आला किंवा हे थेंब पडलेल्या पृष्ठभागाशी संपर्क आला तर कोरोनाव्हायरसची लागण होते, हे आपणा सर्वांना माहितीच आहे. कोरोनाव्हायरस असाच पसरतो आहे, हे जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितलं आहे. मात्र एका संशोधनानुसार कोरोनाव्हायरस हा हवेतूनही (airborne coronavirus) पसरू शकतो, असं शास्त्रज्ञांनी सांगितलं आहे. त्यामुळे आता चिंता अधिक वाढली आहे.

कोरोनाव्हायरस हा हवेतही राहत असून हवेमार्फत पसरत असल्याचं शास्त्रज्ञांना दिसून आला आहे. कोरोनाव्हायरस हा हवेतून बऱ्यात दूरपर्यंत जाऊ शकतो, शिवाय हवेत तो राहू शकतो.

म्हणजे कोरोना संक्रमित व्यक्ती खोकताना, शिंकताना तर या व्हायरस पसरतोच मात्र जेव्हा ती व्यक्ती बोलते, श्वाच्छोवास करते त्यावेळीदेखील व्हायरस पसरू शकतो आणि हा व्हायरस हवेत बराच वेळ राहू शकतो.  एखादी निरोगी व्यक्ती कोरोना व्हायरस असलेल्या हवेत श्वास घेत असेल तर या हवेतील व्हायरस त्या व्यक्तीच्या शरीरात जाऊ शकतात. शिवाय लक्षणं नसलेल्या कोरोना संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्यानंतरही दुसऱ्या व्यक्तीला कोरोनाची लागण होऊ शकते. कारण कोरोना संक्रमित व्यक्तीच्या श्वासामार्फत व्हायरस हवेत पसरू शकतो.

हे वाचा - हवेतूनही पसरू शकतो कोरोना व्हायरस, 32 देशांच्या शास्त्रज्ञांनी दिला इशारा

चीन, अमेरिका, इटली, ब्राझील या देशांतल्या कोरोनाबाधितांच्या प्रकरणांचा अभ्यास केल्यानंतर हा निष्कर्ष या शास्त्रज्ञांनी काढला आहे. जगातल्या 32 देशांच्या 239 शास्त्रज्ञांनी यासंर्भात WHOला पत्र लिहिलं आहे.  या नव्या अभ्यासामुळे बाधित व्यक्तींपासून किती दूर राहायचे काय काळजी घ्यायची याचे निकषही बदलण्याची शक्यता आहे, असं शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे.

हवेतून पसरणाऱ्या कोरोनाव्हायरसचा धोका कसा टाळाल?

शास्त्रज्ञांनी सांगितल्यानुसार,

सोशल डिस्टन्सिंग हे महत्त्वाचं आहेच. कारण संक्रमित व्यक्ती जितकी तुमच्या जवळ असेल तितक्या त्याच्या अ‍ॅरोसोलमार्फत व्हायरस पसरण्याचा धोका जास्त.

तसंच हात धुण्याप्रमाणे घरातील हवादेखील खेळती असावी. म्हणजे व्हेंटिलेशन योग्य असावं.

हे वाचा - हवेतून पसरणारा Coronavirus किती धोकादायक?

मास्क वापरण्यावर अधिक भर द्यायला हवा. आरोग्य कर्मचाऱ्यांनी N95 मास्क वापरणंच गरजेचं आहे, ज्यामध्ये अ‍ॅरोसोल फिल्टर करण्याची क्षमता असते. विशेषत: काही वैद्यकीय प्रक्रिया अशा असतात ज्यावेळी डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी अ‍ॅरोसोलच्या संपर्कात येतात. त्यावेळी या मास्कचा वापर करावाच

बाकी आपण इतर सर्वसामान्य नागरिकांनी साधा कापडी मास्क वापरला तरी हरकत नाही. मात्र शक्यतो घरातही मास्क घालण्याची सवय करा.

एखाद्या खोलीतही एअर फिल्टर आणि अल्ट्राव्हायोलेट लाइट्स असण्याची गरज आहे, जे कोरोनाव्हायरसचा नाश करतील, असंही शास्त्रज्ञांनी सांगितलं.

Published by: Priya Lad
First published: July 8, 2020, 8:16 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading