Home /News /videsh /

‘या’ देशात आढळलं माणसाच्या उंचीएवढं वटवाघूळ? PHOTO बघून बसेल धक्का

‘या’ देशात आढळलं माणसाच्या उंचीएवढं वटवाघूळ? PHOTO बघून बसेल धक्का

चीन मधल्या उद्रेकानंतर वटवाघळांची जगभर चर्चा झाली होती. वटवाघळांवर संशोधनही करण्यात येत असून. त्यांच्यापासूनच व्हायरस पसरला असं अजुन कुठेही सिद्ध झालेलं नाही.

    मनिला 7 जुलै: कोरोनाची साथ आल्यानंतर सगळ्यात जास्त चर्चा झाली ती वटवाघळांची. वाटवाघळांच्या माध्यमातूनच चीनमध्ये कोरोना पसरला अशी माहितीही पुढे आली होती. त्यामुळे या गुढ प्राण्याबद्दल खूप चर्चा झाली होती. अशा एका अजस्त्र वटवाघळाचा एका PHOTOसध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. तो फोटो बघून कुणालाही धक्का बसल्याशीवाय राहणार नाही. हा फोटो ज्याने ट्विटरवर टाकला त्या व्यक्तिनेच आता त्यावर स्पष्टीकरण देत खरं काय आहे त्याचा खुलासा केला आहे. Daily Mailने यासंदर्भात वृत्त दिलं असून या वटवाघळाची माहिती दिली आहे. आशियातल्या काही भागात हे वटवाघूळ आढळून येतं. ते शाकाहारी असून फळांवर आपलं पोट भरतं. इतर वटवाघळांपेक्षा ते मोठं असलं तर माणसांएवढं असत नाही. मात्र त्यांच्या पंखांची लांबी ही अतिशय मोठी असून ती तब्बल 5 फुटांपर्यंत असू शकते. या वटवाघळाच्या पंखाचा फोटो असा पद्धतीने काढण्यात आला की ते माणसांएवढं दिसंत. त्यातच ज्याने हा फोटो सोशल मीडियावर टाकला त्यानेच आता त्याचं स्पष्टिकरण दिलं आहे. या वटवाघळाचा आकार मोठा असल्याने मी त्याला उल्लेख माणसांएवढा असा केला असं त्याने म्हटलं आहे. त्यामुळे घोटाळा झाला आणि माणसांएवढं वटवाघूळ म्हणून तो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. आत्तापर्यंत 1.9 लाख लोकांनी त्याला Reweet केलं असून 2.7 लाख लोकांनी Likes केलं आहे. यावर प्रतिक्रियाचा पाऊस पडत असून लोक अनेक प्रकारची माहिती देत आहेत. चीन मधल्या उद्रेकानंतर वटवाघळांची जगभर चर्चा झाली होती. वटवाघळांवर संशोधनही करण्यात येत असून. त्यांच्यापासूनच व्हायरस पसरला असं अजुन कुठेही सिद्ध झालेलं नाही.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    Tags: BAT, Coronavirus

    पुढील बातम्या