न्यूयॉर्क 30 एप्रिल: कोरोनावर औषध शोधण्यासाठी सगळ्या जगात संशोधन सुरू आहे. अनेक देशांनी एकत्र येऊनही यावर संशोधन सुरू केलंय. अशातच Gilead Sciences या अमेरिकन कंपनीने कोरोनावर लस शोधल्याचा दावा केला आहे. या कंपनीचं Remdesivir हे औषध कोरोनावर प्रभावी ठरू शकते असा दावा कंपनीकडून करण्यात येत आहे. या औषधाच्या तिसऱ्या टप्प्यातल्या ट्रायल्सही यशस्वी ठरल्याचा दावा केला जात आहे. Remdesivir च्या विट्रो (टेस्ट ट्यूब) आणि vivo (शरीरावर) या टेस्ट प्राण्यांवर करण्यात आल्या आहेत. प्राण्यांमध्ये MERS आणि SARS वर त्याचे प्रयोग करण्यात आले आहे. कोरोनाचा व्हायरसही याच समुहाच्या कुळातला व्हायरस आहे हे सिद्ध झालं आहे. त्यामुळे या चाचण्यांचे आलेले सकारात्मक निकाल हे दिलासा देणारे आहेत. हे औषध compassionate-use साठीही पाठवलं जाण्याची शक्यता आहे. आजारात जेव्हा कुठलंही औषध नसतं तेव्हा डॉक्टर अशा पद्धतीचा वापर करतात. म्हणजे ज्या औषधांच्या पूर्ण चाचण्या झालेल्या नसतानाही आणीबाणीच्या काळात ते औषध वापरलं जातं. हे वाचा - कोरोनातून बरे झाल्यानंतर ब्रिटनचे पंतप्रधान जॉन्सन झाले बाबा! अमेरिकेच्या अन्न आणि औषध विभागाने या औषधाला orphan drug चा दर्जा दिला आहे. ज्या औषधांमध्ये रोगावर इलाज करण्याची क्षमता असते आणि त्याच्या उत्पादनासाठी सरकारच्या मदतीची गरज असते अशा औषधांना हा दर्जा दिला जातो. त्यामुळे करांमध्ये सुट मिळते तसेच इतरही सवलती त्या कंपनीला मिळत असतात. त्यामुळे या कंपनीच्या औषधाकडे सगळ्या जगाचं लक्षं लागलं आहे. हेही वाचा - लॉकडाऊनमुळे 70 लाख महिला अनिच्छेने राहणार गर्भवती, UNने जाहीर केली आकडेवारी लवकरच उलघडणार किम यांच्या तब्येतीचं रहस्य, अमेरिकेनं पाठवली 5 गुप्तचर विमानं
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.