लंडन 29 एप्रिल: कोरोनासारख्या जीवघेण्या आजारातून बरे झाल्यानंतर ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्यासाठी आजचा दिवस आनंदाचा ठरला. त्यांची गर्लफ्रेंड आणि होणारी बायको कॅरी सायमंड्सने आज मुलाला जन्म दिला. आई आणि मुलगा या दोघांचीही तब्येत चांगली आहे अशी माहिती त्यांच्या प्रवक्त्यांनी दिली. कोरोना पॉझिटिव्ह निघाल्यानंतर जॉन्सन यांच्यावर उपचार करण्यात आले होते. नंतर त्यांची प्रकृती बरी झाली. सोमवारीच ते पुन्हा कामावर रुजू झाले आहेत. कॅरी आणि जॉन्सन यांनी लंडनच्या NHS मॅटर्निटी होमच्या डॉक्टरांचा आभार मानले आहेत. कॅरी या 2012 पासून ब्रिटनच्या राजकारणात आहेत. फ्रेब्रुवारी महिन्यातच त्यांनी लवकरच लग्न करणार असल्याची घोषणा केली होती. लग्न न करता ब्रिटनच्या पंतप्रधान निवासस्थानात राहणारं हे पहिलंच जोडपं आहे. तर पंतप्रधान पदावर असताना मुल होणारे जॉन्सन हे तिसरे पंतप्रधान आहेत. या आधी टोनी ब्लेअर यांना 2000मध्ये आणि डेव्हिड कॅमरून यांना 2010मध्ये वडिल बनले होते. हे वाचा - कोरोनावर लस शोधणाऱ्या ऑक्सफर्डच्या टीममध्ये ‘ही’ भारतीय शास्त्रज्ञ सोमवारी कामावर पुन्हा परतल्यानंतर देशातला लॉकडाऊन आणखी वाढण्याचे संकेत त्यांनी दिले होते. देश अतिशय जोखमीच्या आणि गंभीर स्थितीतून जात आहे. अशा परिस्थितीत देशातल्या जनतेला मरणाच्या दारात मी सोडू इच्छित नाही असं मतही त्यांनी व्यक्त केलं होतं. ब्रिटनमध्ये आत्तापर्यंत 20 हजार जणांचा मृत्यू झाला आहे. हेही वाचा - कोरोना व्हायरस आला कुठून? चीनच्या वुहान लॅबच्या खुलाश्याने गुढ वाढलं सेनेच्या मॉक ड्रीलमध्ये जखमी की मृत्यू? किम गायब झाल्यानंतर रंगल्या 5 चर्चा
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.