धनंजय मुंडेंच्या संपर्कात आलेल्या अधिकाऱ्यांचे आले रिपोर्ट, डॉक्टर म्हणाले...

धनंजय मुंडेंच्या संपर्कात आलेल्या अधिकाऱ्यांचे आले रिपोर्ट, डॉक्टर म्हणाले...

अंबाजोगाई येथील प्रयोगशाळा उद्घाटन कार्यक्रमात पालकमंत्री धनंजय मुंडे उपस्थित होते.

  • Share this:

बीड, 15 जून : सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहे. परंतु, त्यांच्या संपर्कात आल्यामुळे बीडचे जिल्हाधिकारी, अंबाजोगाई मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांची चिंता वाढली होती. मात्र, रविवारी रात्री सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला आहे.

अंबाजोगाई येथील प्रयोगशाळा उद्घाटन कार्यक्रमात पालकमंत्री धनंजय मुंडे उपस्थित होते. याच कार्यक्रमाला लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारीही उपस्थित होते. पालकमंत्री मुंडे यांचा मुंबईमध्ये स्वॅब घेतल्यानंतर ते पॉझिटिव्ह आले. त्यांनतर बीडमध्ये त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांना क्वारंटाइन केले होते.

हेही वाचा - 15 राज्यांसाठी मोदी सरकारची नवीन योजना, 81 कोटी रेशन कार्डधारकांचा होणार फायदा

काही जणांचे अगोदरच स्वॅब घेतले होते. रविवारी रात्री जिल्हाधिकारी, अंबाजोगाईचे अधिष्ठाता यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांचे स्वॅब घेतले होते. त्या सर्वांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

बीड  जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे 88 रुग्ण सापडले असून पैकी 2 मयत झाले आहेत. 64 कोरोनामुक्त झालेले असून 22 जणांवर अद्यापही उपचार सुरू आहेत.

धनंजय मुंडे यांच्यावर मुंबईत उपचार सुरू

धनंजय मुंडे यांच्यावर मुंबईतील ब्रीच कॅंडी रुग्णालयात उपचार सुरू आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे. धनंजय मुंडे यांची दोनदा कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यातील एक निगेटिव्ह आला आणि पॉझिटिव्ह आला. त्यांना कोणतीही लक्षणं दिसली नाहीत पण श्वसानाचा त्रास जाणवत होता, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली होती. तसंच, त्यांची प्रकृती स्थिर असून येत्या काही दिवसात ते आपल्यासोबत काम करतील, असंही राजेश टोपे यांनी सांगितलं होतं.

संपादन - सचिन साळवे

First published: June 15, 2020, 12:18 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading