कम्पाला, 16 एप्रिल : कोरोनाव्हायरस गेल्या अनेक दशकांतील सर्वात भयंकर आजा ठरत आहे. या आजारामुळे पहिल्यांदाच सर्व देश लॉकडाऊन झाले आहेत. तर, काही देशांमध्ये सामाजिक अंतर Social Distancing पाळण्यासाठी कडक नियम लादले जात आहेत. मात्र या सगळ्यात युगांडामध्ये एक चिंताजनक ट्रेंड समोर आला आहे. युगांडाच्या आरोग्य मंत्रालयाने उघडकीस आणले आहे की, सरकारी आयसोलेशन सेंटरमध्ये लोकांनी अनोळखी लोकांशी शारीरिक संबंध ठेवत आहेत. त्यामुळे कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता आहे. युगांडाच्या आरोग्य मंत्रालयाच्या स्थायी सेक्रेटरी डियाना अट्विने यांनी रेडिओ वनला सांगितले की, लोकांच्या अशा वागण्याने कोरोना थांबविण्यासाठी जे प्रयत्न केले जात आहे, त्यावर पाणी फेरेल. आयसोलेशनमध्ये असताना लोकं एका खोलीतून दुसर्या खोलीत जात आहेत. यामुळे पुढे कोरोना विषाणूचा संसर्ग पसरू शकतो. वाचा- ‘लॉकडाऊनमुळे आलेला स्ट्रेस दूर करण्यासाठी सेक्स करा पण…’,आरोग्य विभागाचा सल्ला युगांडाचे नागरिक कोरोना विषाणूबाबत अद्याप गंभीर नाहीत आहेत. त्यामुळे आयसोलेशनमध्ये राहणारे काही लोक अनोळखी लोकांसोबत शारीरिक संबंध ठेवत आहेत. त्यांना वेगळे ठेवल्यानंतर रात्री ते इतरांच्या खोल्यांमध्ये जात आहेत. अनोळखी व्यक्तींबरोबर प्रेमसंबंध असल्याशिवाय काही लोक आपल्या मित्रांना आणि चुलतभावांना भेटण्यासाठी हॉटेलमध्ये फिरत असतात. हे खूप धोकादायक आहे. वाचा- ‘या’ देशात CoronaVirus ला दूर ठेवण्यासाठी वापरला जातो परफ्युम अटवीन यांनी यावेळी, याच भीतीमुळे काही लोकांना 14 दिवसांनंतरही क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आले आहे. क्वारंटाईन सेंटरमध्ये सुरक्षा अधिकारीही तैनात करण्यात आले आहे, असे सांगितले. वाचा- कपल्सचं खाजगी बोलणं असो वा ऑफिसची मीटिंग, कोणतं App व्हिडीओ कॉलसाठी सुरक्षित? मार्चमध्ये आरोग्य मंत्रालयाने कोरोना विषाणूच्या संसर्गाची प्रकरणे कमी करण्यासाठी 17 वेगळी केंद्रे सुरू केली होती. मंत्रालयाने म्हटले होते की कम्पाला आणि एन्टेबे येथे 17 केंद्रे सुरू केली गेली आहेत जेथे लोकांना ठेवले जात आहे. एवढेच नाही तर, विद्यापीठं, हॉटेल, रुग्णालये, लॉज आणि आयसोलेश क्रेंद्रे येथे एकूण 232 लोकांना ठेवण्यात आले आहे. युगांडामध्ये सध्या कोरोना विषाणूची 54 प्रकरणे आहेत तर 7 लोक बरे झाले आहेत. कोरोना संसर्गामुळे आतापर्यंत येथे कुणाचा मृत्यू झालेला नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.