Home /News /lifestyle /

'लॉकडाऊनमुळे आलेला स्ट्रेस दूर करण्यासाठी सेक्स करा पण...', आरोग्य विभागाचा सल्ला

'लॉकडाऊनमुळे आलेला स्ट्रेस दूर करण्यासाठी सेक्स करा पण...', आरोग्य विभागाचा सल्ला

वास्तुनुसार जोडप्यांचा बेड नेहमी लाकडाचा असावा.

वास्तुनुसार जोडप्यांचा बेड नेहमी लाकडाचा असावा.

Lockdown मुळे लोकांमधील वाढता स्ट्रेस कमी करण्यासाठी Newyork मध्ये विशेष हेल्थ गाइडलाइन्स जारी करण्यात आल्यात. ज्यामध्ये सेक्स लाइफवर (sex) लक्ष देण्यात आलं आहे.

    न्यूयॉर्क, 14 एप्रिल : कोरोनाव्हायरसमुळे (CoronaVirus) भारतात लागू करण्यात आलेला लॉकडाऊन (Lockdown)आता 3 मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. गेले 21 दिवस घरात बंदिस्त असलेली लोकं आणखी काही दिवस घरात बंदिस्त राहणार आहेत. घरातल्या घरात राहिल्याने लोकांना मानसिक आरोग्याच्या समस्या बळावत आहेत. स्ट्रेस वाढतो आहे. मानसिक आरोग्य राखण्यासाठी भारतातील लोकं घरात व्यायाम, योगा करत आहेत, आवडीचे छंद जोपासत आहेत. तर दुसरीकडे न्यूयॉर्कमध्ये (New York) मात्र स्ट्रेस (Stress) कमी करण्यासाठी सेक्स (Sex) करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. जगभरातील अशा लॅब जिथे कोरोनासारख्या महाभयंकर व्हायरसवर सुरू आहेत प्रयोग लॉकडाऊनमुळे लोकांमधील वाढता स्ट्रेस कमी करण्यासाठी न्यूयॉर्कच्या आरोग्य विभागाने (NYC health department) विशेष गाइडलाइन्स जारी केल्यात. ज्यामध्ये लोकांच्या सेक्स लाइफवर विशेष लक्ष देण्यात आलं आहे, असं न्यूयॉर्क पोस्टने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. स्ट्रेस दूर करण्यासाठी सेक्स आणि हस्तमैथुनची मदत घेऊ शकतात असं, असा सल्ला न्यूयॉर्क हेल्थ डिपार्टमेंटने दिला आहे. CoronaVirus नेमका आहे तरी कसा? 5 महिन्यात उलगडलेली विषाणूची रहस्यं सुरक्षित सेक्स करा सध्या जी परिस्थिती आहे, त्या परीपरिस्थितीत सेक्समुळे लोकं शारीरिक आणि मानसिकरित्या स्वस्थ राहतील असं आरोग्य विभागानं म्हटलं आहे. मात्र सुरक्षित सेक्स करण्याचा सल्ला दिला आहे. जोडीदार हा ओळखीचाच असावा. म्हणजे ज्याच्याशी तुम्ही लग्न केलं आहे किंवा तो आधीपासून तुमच्या सहवासात आहे, असंही आरोग्य विभागानं स्पष्ट केलं आहे. शिवाय स्वच्छता आणि आवश्यक ती सर्व खबरदारी घ्या. कंडोमचा वापर जरूर करा. सेक्स किंवा हस्तमैथुन करण्यापूर्वी आणि केल्यानंतर हात स्वच्छ धुवा. KISS करू नका या गाइडलाइनमध्ये ओरल सेक्सबाबत वेगळाच सल्ला देण्यात आला आहे. ओरल सेक्समध्ये किस करण्यास मनाई करण्यात आली आहे. कारण कोरोनाव्हायरस हा किसमार्फत सहज पसरू शकतो. किस केल्याने तोंडातील लाळ एकमेकांच्या तोंडात जाते आणि अशात इन्फेक्शन पसरू शकतं. संकलन, संपादन - प्रिया लाड
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: Corona

    पुढील बातम्या