जाहिरात
मराठी बातम्या / विदेश / 'या' देशात Coronavirus ला दूर ठेवण्यासाठी वापरला जातो परफ्युम

'या' देशात Coronavirus ला दूर ठेवण्यासाठी वापरला जातो परफ्युम

'या' देशात Coronavirus ला दूर ठेवण्यासाठी वापरला जातो परफ्युम

तुर्कीमध्ये (Turkey) कलोन हा विशेष प्रकारचा परफ्युम (Perfume) कोरोनाव्हायरसपासून बचावासाठी sanitizer प्रमाणे वापरला जातो आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

अंकारा, 14 एप्रिल : कोरोनाव्हायरसपासून (coronavirus) बचावासाठी आपण सर्व जण साबण-पाण्याने हात स्वच्छ धुवत आहोत किंवा sanitizer वापरत आहोत. मात्र एक देश असा आहे, जिथं कोरोनाला दूर ठेवण्यासाठी परफ्युमचा (perfume) वापर केला जातो आहे. तुर्कीमध्ये (turkey) कोविड-19 शी लढा देण्यासाठी विशेष प्रकारच्या परफ्युमचा वापर होतो आहे. ज्याला तिथल्या स्थानिक भाषेत kolonya असं म्हटलं जातं.खरंतर हा परफ्युमपेक्षा जास्त कलोन आहे. म्हणजे असा सुगंध ज्यामध्ये एसेंशियल ऑइलचं प्रमाण खूप कमी असतं, तर अल्कोहोल जास्त प्रमाणात असतं. हा परफ्युम तुर्कीच्या संस्कृतीचा भाग आहे. जेवणापूर्वी पाहुण्यांच्या हातावर सर्वात आधी कलोन शिडकलं जातं. स्वच्छेत अव्वल असलेल्या तुर्कीमध्ये sanitizer म्हणूनही याचा वापर केला जातो. या परफ्युममुळे 80% जर्म्सचा नाश होतो, असं मानलं जातं. कोरोनाशी लढण्यासाठी हा परफ्युम जास्त प्रभावी मानला जातो आहे. कारण हा त्यांच्या दैनंदिन जीवनाचा भाग आहे. रद्द झालेल्या लग्नाची कथा! कोरोनामुळे बोहोल्यावरून नवरदेव रुग्णालयात तर वऱ्हाडी तुर्कीच्या आरोग्यमंत्र्यांनी या परफ्युमचे फायदे सांगत कोरोनाच्या लढाईत त्याचा वापर करण्याची सूचना 11 मार्चला केली. देशातल्या सर्व नागरिकांना हा परफ्युम मिळावा यासाठी सरकारनेही मोठी पावलं उचललीत. 13 मार्चला पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळणं बंद केलं आहे, जेणेकरून जास्तीत जास्त कलोन तयार होइल. तुर्की मीडियानेही याला anti-covid-19 परफ्युम म्हटलं आहे. कोरोनाव्हायरसची प्रकरणं वाढल्यानंतर या परफ्युमची विक्रीही वाढली आहे. द इकोनॉमिस्टच्या मते, गेल्या काही आठवड्यात या परफ्युमची ऑनलाईन विक्री 3400% वाढली आहे, तसंच दुकानातील खरेदीही वाढली आहे. कोरोनाशी लढणाऱ्या भारताचं महिलेनं केलं कौतुक, अमेरिकेत दाखल केला गुन्हा संकलन, संपादन - प्रिया लाड

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: corona
  • First Published :
जाहिरात
जाहिरात