मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

कपल्सचं खाजगी बोलणं असो वा ऑफिसची मीटिंग, कोणतं App व्हिडीओ कॉलसाठी सुरक्षित?

कपल्सचं खाजगी बोलणं असो वा ऑफिसची मीटिंग, कोणतं App व्हिडीओ कॉलसाठी सुरक्षित?

आणखीन 14 दिवस लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय राज्याने घेतला आहे. त्यामुळे work from home ला पर्याय नाही. जीवाभावाच्या व्यक्तीशी बोलायलाही Video calling app च वापरावं लागणार. कुठलं अॅप सर्वात सेफ आहे?

आणखीन 14 दिवस लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय राज्याने घेतला आहे. त्यामुळे work from home ला पर्याय नाही. जीवाभावाच्या व्यक्तीशी बोलायलाही Video calling app च वापरावं लागणार. कुठलं अॅप सर्वात सेफ आहे?

आणखीन 14 दिवस लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय राज्याने घेतला आहे. त्यामुळे work from home ला पर्याय नाही. जीवाभावाच्या व्यक्तीशी बोलायलाही Video calling app च वापरावं लागणार. कुठलं अॅप सर्वात सेफ आहे?

  • Published by:  अरुंधती रानडे जोशी

मुंबई, 13 एप्रिल : जगात अनेक देशांमध्ये कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आलं आहे. भारतातही कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढत आहे. आतापर्यंत 9 हजारहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात आणखीन 14 दिवस लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान या लॉकडाऊनमुळे अनेक कंपन्या, व्यवसाय ठप्प आहेत. तर काही कंपन्यांची कामं work from home सुरू आहेत. याशिवाय लोक घरात असल्याने नातेवाईक, मित्र-मैत्रिणी, ऑफिसचे सहकारी यांच्याशी संपर्कासाठी व्हिडीओ कॉलिंगची सेवा वापरण्याचं प्रमाण वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे.

अगदी तरुणांपासून वयोवृद्धांपर्यंत आणि ऑफिसमधील छोट्या कामांपासून ते मिटिंगपर्यंत सर्व काम घरी राहून व्हिडीओ कॉलवर केली जात आहेत. मित्र मैत्रीणी- प्रेमीयुगुल यांना भेटता येत नाही म्हणून हमखास व्हिडीओ कॉलिंगचा वापर केला जातो. मात्र व्हिडीओ कॉल करताना वापरली जाणारी अॅप्स ही सेफ आहेत का? याचा विचार केलायत का? हॅकिंगचा धोका असल्याने तुम्ही वापरत असलेल्या अॅपमुळे खासगी माहिती हॅकर्सपर्यंत पोहोचणार नाही याची काळजी घेणं आवश्यक आहे. नाहीतर कोरोनाला रोखण्यासाठी घऱात राहून वेगळंच संकट येण्याची शक्यता आहे.

लॉकडाऊनमध्ये ऑफिसमधील सहकाऱ्याना किंवा मित्र-मैत्रिणींना व्हिडीओ कॉल करण्यासाठी सेफ अॅप कोणती याची तुम्हाला माहिती देणार आहोत. ही अॅप वापरली तर आपली माहितीही सुरक्षित राहिल आणि व्हिडीओ कॉलिंगचा आनंदही पुरेपूर घेता येईल.

facetime

गुगल प्ले स्टोर किंवा आयफोन प्ले स्टोअर वर व्हिडीओ कॉलिंगसाठी अनेक अॅप उपलब्ध आहेत. मात्र त्या सर्वांवर विश्वास ठेवणं थोडं धोक्याचं आहे. iPhone वर इनबिल्ड FaceTime पर्याय उपलब्ध आहे. पर्सनल व्हिडीओ कॉलिंगसाठी हे सर्वात सुरक्षित अँप आहे. यावर ग्रूप कॉलिंगही करता येते. ह्या अॅपवरून माहिती लिक होण्याचा धोका कमी आहे. आयफोनची सिक्युरिटी क्रॅक करणं कठीण आहे. अॅपचा वापर करून iOS किंवा MacOS असणाऱ्या व्यक्ती एकमेकांना व्हिडीओ कॉल करू शकतात. या अॅपद्वारे एकावेळी 32 लोक कनेक्ट होऊ शकतात.

Signal

हे अ‍ॅप सर्वात सुरक्षित मानले जाते. या अ‍ॅपद्वारे व्हिडिओ कॉलिंग किंवा चॅट केलं तर हॅक करणं किंवा खासगी माहिती कुणीही सहज हॅक करू शकत नाही. हे व्हिडीओ कॉलिंग End-to-end encryption सेवा देतं. म्हणजे जे लोकं एकमेकांना या अॅपद्वारे कनेक्ट आहेत त्याव्यतिरिक्त तिसरा व्यक्ती ही माहिती सहज हॅक करून पाहू शकत नाही.

WhatsApp

WhatsApp कडून त्यांच्या ग्राहकांच्या सुरक्षेची खास काळजी घेतली जाते. हे जगभरात सर्वात जास्त वापरलं जाणारं चॅटिंग आणि व्हिडीओ कॉलिंग अॅप आहे. या अॅपमध्ये एका वेळी चार जण जोडले जाऊ शकतात. पहिल्यांदा व्हिडीओ कॉलिंग सेवा सुरू झाली तेव्हा इस्रायलच्या एका फर्मने व्हॉट्सअॅपचा डेटा हॅक करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर मात्र व्हॉट्सअॅपनं आपल्या सुरक्षिततेबाबत अधिक काळजी घेतली.

अन्य बातम्या

वीज बिलासंदर्भात मोठा निर्णय; या महिन्याच्या मीटर रीडिंगचं काय करायचं?

कोरोना: :जीवनदायी ठरतेय 'ही' जुनी उपचार पद्धत, 5 रुग्ण अगदी ठणठणीत झाले

First published:

Tags: Coronavirus