Home /News /videsh /

आधी झाला कोरोना मग हृदय पडलं निकामी, अमेरिकेतील पहिल्या मृत रुग्णाची अवस्था पाहून डॉक्टर हैराण

आधी झाला कोरोना मग हृदय पडलं निकामी, अमेरिकेतील पहिल्या मृत रुग्णाची अवस्था पाहून डॉक्टर हैराण

कोरोनानं रुग्णाच्या हृदयाची अशी केली अवस्था, पाहून डॉक्टरांनाही नाही बसला विश्वास.

    न्यूयॉर्क, 29 एप्रिल : अमेरिकेत कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाबाधितांची संख्या 10 लाखांहून अधिक झाली आहे तर, 58 हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. फेब्रुवारीमध्ये अमेरिकेत कोरोनामुळं पहिला मृत्यू झाला. मात्र आता या मृत्यूबाबत अनेक दावे समोर आले आहे. एका अमेरिकन फॉरेन्सिक पॅथॉलॉजिस्टने असा दावा केला आहे की कोरोना विषाणूमुळे अमेरिकेत मृत्यू झालेल्या पहिल्या व्यक्तीचे हृदय छिन्न विच्छिन्न झालं होतं. या प्रकरणानंतर हे कळले की अमेरिकेत कोरोना विषाणूमुळे झालेला हा पहिला मृत्यू होता. 6 फेब्रुवारी 2020 रोजी कॅलिफोर्नियाच्या सॅन जोस भागात राहणाऱ्या 57 वर्षीय महिलेचा फ्लूमुळे मृत्यू झाला. पण आता त्यांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याचे समोर आले आहे. एवढेच नाही तर कोरोनामुळं त्यांचे हृदय छिन्न विच्छिन्न झालं होतं. वाचा-इतक्या दिवसांचा असावा लॉकडाऊन, आनंद महिंद्रा यांनी सरकारला दिला सल्ला द मर्क्युरी न्यूजनं दिलेल्या वृत्तानुसार 25 एप्रिल रोजी मृत पेट्रिसिया यांची पुन्हा अटॉप्सी करण्यात आली. यावेळी कोरोना विषाणूमुळे त्यांच्या हृदयात बिघाड झाला होते, असे समोर आले. मुख्य म्हणजे पेट्रीसियाला यांना हृदयविकाराचा आजार नव्हता. पॅट्रिशिया यांच्या पतीनं सांगितले की, त्यांची पत्नी खूपच निरोगी होती. रोज व्यायाम करायची. कोलेस्टेरॉल किंवा रक्तदाबाचा त्रासही नव्हता. असे असूनही, तीला कोरोना कसा झाला हे मला समजले नाही. पण सुरुवातीला असा विश्वास होता की पेट्रीसिया यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मात्र आता कोरोनामुळं मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. पॅट्रिशिया यांची पुन्हा अटॉप्सी केल्यानंतर कोरोना विषाणूमुळे पॅट्रिशिया यांच्या हृदयाचे वॉल्व फाटले असल्याचे समोर आले. फॉरेन्सिक पॅथॉलॉजिस्ट डॉ. जुडी मेलिनेक म्हणाले की पेट्रीसियाच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती आणि कोरोना विषाणूचा भयंकर संघर्ष झाला होता. वाचा-धक्कादायक! दारू समजून प्यायला सॅनिटायझर? साताऱ्यातील तिघांचा मृत्यू दरम्यान, जगभरातील शास्त्रज्ञांनी संशोधन केले असून कोरोना विषाणूमुळे मृत्यू झालेल्या पाचपैकी एक रुग्ण हृदयाच्या समस्येमुळे मरण पावत असल्याचे आढळले आहे. कारण कोरोना विषाणू हृदयावर आक्रमण करीत आहे. वाचा-सेनेच्या मॉक ड्रीलमध्ये जखमी की मृत्यू? किम गायब झाल्यानंतर रंगल्या 5 चर्चा संपादन, संकलन-प्रियांका गावडे.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Corona

    पुढील बातम्या