मुंबई, 23 मार्च : आता किमान तुम्ही तरी ऐका, असं कळकळीचं आवाहन एका मराठी माणसाने थेट इटलीतून केलं आहे. ‘मागच्या आठवड्यात इथलं सरकार लोकांना सूचना देत होतं. गर्दी टाळा असं आवाहन करत होतं. पण लोकांनी ते गांभीर्याने घेतलं नाही. जनतेच्या निष्काळजीपणाचे परिणाम आत्ता दिसत आहेत. दररोज शेकडो माणसं मरत आहेत…’ हे अनुभव आहेत इटलीत स्थायिक असणाऱ्या या मराठी माणसाचे. अभिषेक डेरले हे मूळजे नाशिक जिल्ह्यातल्या निफाडचे रहिवासी. ते सध्या इटलीच्या तुरीन प्रांतात स्थायिक आहेत. मॉलिक्युलर बायोटेक्नॉलॉजी या विषयात त्यांची PhD सुरू आहे. त्यांनी इटलीची परिस्थिती जवळून अनुभवल्यानंतर आता भारतात सुरू असलेला प्रकार पाहून सोशल मीडियावर कळकळीचं आवाहन केलं आहे. वाचा - ‘… तर 48 तासात दहा हजार लोक मरतील’, न्यूझीलंडच्या पंतप्रधानांनी दिला इशारा अभिषेक म्हणतात, “मागच्या काही आठवड्यात इटलीची स्थिती जवळून पाहतोय. इथल्या जनतेचा निष्काळजीपणा. दुसऱ्या स्टेजला असताना जनतेनं दुर्लक्ष केलं. त्याचा परिणाम आज दिसतो आहे. भारतात हा व्हायरसचा आजार दुसऱ्या टप्प्यात आहे. आताच काळजी घ्या. भारतीयांना आणि महाराष्ट्रातल्या जनतेला कळकळीची विनंती, केंद्र सरकार आणि राज्य सरकार ज्या सूचना देते आहे त्यांचं पालन करा.” अभिषेक डेरले यांनी शेअर केलेले इटलीतले अनुभव - इटलीत कोरोनाव्हायरसचा हाहाकार माजला कारण,सरकारनं दिलेल्या सूचना,नागरीकांनी गांभीर्यानं घेतल्या नाही - युरोपियन देशातील नागरीकांनीही निष्काळजीपणा दाखवला - म्हणून कोरोनाचा प्रसार झपाट्यानं झाला - भारतात,सरकार गंभीर आहे - दिलेल्या सूचना स्पष्ट पाळा - आता स्टेज 2 वर आहे - ही स्टेज अत्यंत घातक - मला काही होत नाही,मला काही झालं नाही … ही मानसिकता चुकीची - कोरोनाचा वाहक बनू नका - जगात कोरोनाच्या व्हॅकसीनेशनचा शोध सुरू आहे - संयम बाळगा,काळजी घ्या,सरकारच्या सूचना स्पष्ट पाळा
#Coronavirus 'किमान आता तर ऐका, घरी बसा!' इटलीत राहणाऱ्या नाशिकच्या अभिषेक डेरले यांचे डोळे उघडणारे अनुभव... pic.twitter.com/SMKbcAwryw
— Manoj Khandekar (@manojkhandekar) March 23, 2020