मास्क घालून धावत होता तरूण, काही मिनिटांत फुटली फुफ्फुसं; अवस्था पाहून डॉक्टरही हादरले

मास्क घालून धावत होता तरूण, काही मिनिटांत फुटली फुफ्फुसं; अवस्था पाहून डॉक्टरही हादरले

लोकांना घरातून बाहेर पडताना मास्कचा वापर करणे बंधनकारक केले आहे. मात्र मास्कचे काही तोटेदेखील समोर येत आहेत.

  • Share this:

बीजिंग, 18 मे : कोरोनाव्हायरस (Coronavirus) संसर्गाचा प्रसार जगभरात झाल्यानंतर लोकांना घरातून बाहेर पडताना मास्कचा वापर करणे बंधनकारक केले आहे. मात्र मास्कचे काही तोटेदेखील समोर येत आहेत. कोरोनाचे केंद्र ठरलेल्या वुहानमध्ये एक धक्कादायक घटना घडली. मास्क घालून धावत असताना एका तरुणाचं चक्क फुफ्फुसं दबावमुळे फुटली. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती नाजूक आहे. याआधी मास्कमुळं एका 14 वर्षाच्या मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता.

न्यूयॉर्क पोस्टनं दिलेल्या वृत्तानुसार, 26 वर्षीय तरुण जवळजवळ तीन किमी धावला होता. मात्र अचानक त्यांचया फुफ्फुसांवर दबाव वाढला आणि तो बेशुद्द पडला. त्यानंतर त्याला वुहान सेंट्रल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. सध्या या व्यक्तीच्या फुफ्फुसातील तीन महत्त्वपूर्ण शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, मास्क घालून धावल्यामुळं, त्याच्या डाव्या फुफ्फुसाला छिद्र पडलं आणि तेथून हवा बाहेर येऊ लागली. या दाबांचा हृदयावरही परिणाम झाला आणि जबरदस्त दबावामुळे ते डावीकडून उजवीकडे जाऊ लागले, ज्यामुळे फुफ्फुसांचे अधिक नुकसान झालं. याआधी बीजिंगमध्येच 14 वर्षाच्या मुलाचा मास्कमुळं मृत्यू झाला होता.

वाचा-ऐकावं ते नवलच! 1940 मध्ये हरवलेली लग्नाची अंगठी 80 वर्षांनी सापडली

या स्थितीस न्यूमोथ्रॉक्स म्हणतात

डॉक्टरांच्या मते फुफ्फुसाच्या पंक्चर होण्याच्या अवस्थेला न्यूमोथ्रॉक्स म्हणतात. यामध्ये, फुफ्फुस पंक्चर होतात आणि फुफ्फुस आणि छातीच्या भिंती दरम्यान हवा भरली जाते. यानंतर माणसाची फुफ्फुसे लहान होणे थांबतात आणि त्याला श्वास घेण्यात त्रास होतो. अशा परिस्थितीत, एखाद्याचा मृत्यू होतो. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, मास्कमुळे फुफ्फुसांवर अतिरिक्त दबाव वाढतो आणि ऑक्सिजन पुरेसा प्रमाणात उपलब्ध होत नाही.

वाचा-पगार मागितला म्हणून गेली नोकरी, पोट भरण्यासाठी एक डॉक्टर झाला चायवाला

बीजिंगमध्ये मास्क वापरण्यास सक्ती नाही

कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी अनेक महिने मास्क घालण्याची सक्ती केल्यानंतर आता बीजिंगमध्ये मास्क वापरण्यास सक्ती नाही आहे. कोव्हिड-19च्या उद्रेकाची सुरुवात चीनमधील बीजिंगमधून झाली. दरम्यान कोरोना मुक्त झाल्याचे चीन सांगत असतानाच पुन्हा कोरोनानं शिरकाव करण्यास सुरुवात केली आहे.

वाचा-चीननं लपवला कोरोनाबाधितांचा आकडा? आतापर्यंतचा सर्वात मोठा डेटा आला समोर

First published: May 18, 2020, 12:12 PM IST
Tags:

ताज्या बातम्या