ऐकावं ते नवलच! 1940 मध्ये हरवलेली लग्नाची अंगठी 80 वर्षांनी सापडली

ऐकावं ते नवलच! 1940 मध्ये हरवलेली लग्नाची अंगठी 80 वर्षांनी सापडली

Margarete Herzog या महिलेची 80 वर्षांपूर्वी हरवलेली अंगठी सापडली आहे.

  • Share this:

बर्लिन, 18 मे : एखादी जिवलग वस्तू हरवली की सर्वांनाच खूप दु:ख होतं. ती शोधण्याचे अतोनात कष्ट घेतले जातात पण ती वस्तू पुन्हा नाहीच सापडली तर कालांतराने ती आपण विसरून जातो. पण विचार जर तुमची एखादी आवडीची वस्तू 80 वर्षांनी सापडली तर? आणि विशेष म्हणजे ही वस्तू प्रत्येकासाठी अत्यंत जवळची असणारी लग्नातील अंगठी असेल तर? असाच काहीसा प्रकार  Margarete Herzog या महिलेच्या बाबतीत घडला आहे. त्यांची 80 वर्षांपूर्वी हरवलेली अंगठी सापडली आहे. जर्मनीतील ही घटना आहे. सार्वजनिक शौचालयामध्ये हात धूत असताना त्यांची अंगठी हरवल्याची माहिती त्यांच्या मुलीने दिली आहे. आज त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत ती अंगठी पोहोचवण्यात आली आहे मात्र ती घालण्यासाठी मार्गारेट हयात नाहीत.

(हे वाचा-प्रियांकाने केसांचं हे नेमकं काय केलंय? डान्सचा VIDEO पाहून चाहत्यांचा सवाल)

मार्गारेट यांची मुलगी सांगते की तिच्या आईने अंगठी हरवली तेव्हा शोधण्याचा खूप प्रयत्न केला होता. मात्र त्यावेळी अंगठीचा शोध लागला नाही. आता ती सापडल्यामुळे त्यांना खूप आनंद झाला आहे. कारण अंगठी घालण्यासाठी आई  नसली तरी आईची एक निशाणी मिळाल्याचा त्यांना आनंद आहे. त्या सांगतात की त्यांच्या आईने अंगठी परत मिळेल ही आशा सोडली होती. 1996 मध्ये मार्गारेट यांचा मृत्यू झाला. जर्मनीतील एका वृत्तसंस्थेच्या मते धातू गोळा करण्याचा छंद असणाऱ्या एका इसमाला ही अंगठी एका बागेजवळून जाणाऱ्या पाण्याच्या प्रवाहात सापडली.

(हे वाचा-कृष्णाच्या रुपात बाबाला पाहून स्वप्निलची मुलं अचंबित, त्यांचा विश्वासच बसला नाही)

त्या अंगठीवर नावाची अद्याक्षरं आणि 30 मार्च 1940 ही तारीख गोंदण्यात आली होती. त्या इसमाने विवाह कार्यालयात जाऊन चौकशी केली तेव्हा त्यांना कळलं की त्यादिवशी केवळ मार्गारेट यांच्या लग्नाची नोंदणी झाली होती. त्यानंतर शोध घेतल्यानंतर त्यांच्या मुलीकडे रिंग सुपूर्द करण्यात आली.

First published: May 18, 2020, 11:56 AM IST
Tags:

ताज्या बातम्या