चीननं लपवला कोरोनाबाधितांचा आकडा? आतापर्यंतचा सर्वात मोठा डेटा आला समोर

चीननं लपवला कोरोनाबाधितांचा आकडा? आतापर्यंतचा सर्वात मोठा डेटा आला समोर

एकीकडे वुहानच्या लॅबमधून कोरोना पसरल्याचा दावा, अमेरिका करत असली तरी त्याबाबत ठोस पुरावे सापडले नाही आहेत. मात्र आता चीननं कोरोनाना रुग्णांची आणि मृतांची माहितीही लपवल्याचा आरोप केला जात आहे.

  • Share this:

बीजिंग, 18 मे : चीनच्या वुहानमधून कोरोनाचा जगप्रसार झाला. एकीकडे वुहानच्या लॅबमधून कोरोना पसरल्याचा दावा, अमेरिका करत असली तरी त्याबाबत ठोस पुरावे सापडले नाही आहेत. मात्र आता चीननं कोरोनाना रुग्णांची आणि मृतांची माहितीही लपवल्याचा आरोप केला जात आहे. चीनमध्ये 6 लाख 40 हजारहून अधिक कोरोना रुग्ण होते, मात्र चीन सरकारनं केवळ 82 हजार रुग्ण असल्याचे जाहीर केलं आहे. ही धक्कादायक आकडेवारी फॉरेन पॉलिसी मॅगझिन आणि '100 रिपोर्टर' मध्ये प्रसिद्ध केली आहे.

चिनी सैन्याच्या National University of Defense Technologyने कोरोना संदर्भातील एक डेटा तयार केला होता. आता हा डेटा लीक झाल्याची माहिती समोर आली आहे. यात देशभरातील पसरलेल्या हॉस्पिटलची ठिकाणे, अपार्टमेंट कंपाऊंड, हॉटेल, सुपरमार्केट, रेल्वेस्टेशन्स, रेस्टॉरंट्स आणि शाळा संबंधित ठिकाणांची नावं एकत्र करण्यात आली आहेत.

'100 रिपोर्टर' या मासिकेनं अशी माहिती दिली आहे की, "हा डेटा व्यापक स्वरुपाचा नसला तरी, यातील आकडेवारी आश्चर्यकारक आहे. याच 6 लाख 40 हजारहून अधिक अपडेट आहेत, यात किमान 200 शहरांची माहिती आहे. म्हणजेच या आकडेवारीवरून 6 लाख 40 हजार प्रकरणं नोंदवली गेली आहेत". बीजिंगने कोरोना व्हायरस डेटा किती आणि किती लोकसंख्येवर जमा केला याचा उल्लेखही यात केला आहे. या डेटाच्या लीकमुळे चीनचा खोटेपणा जगासमोर आला आहे.

वाचा-लॉकडाऊननंतरही कोरोनाचा कहर सुरूच, 24 तासांत 157 रुग्णांनी गमावले प्राण

चीनकडून याबाबत अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. पण चिनी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनी परदेशी माध्यमांना "निःपक्षपाती" अहवाल देण्यास सांगितलं आहे. प्रवक्त्याने ट्विटरवर लिहिलं की, “कोव्हिड-19 विरुद्ध जिंकण्याकरिता अनुकूल वातावरण निर्माण करण्यासाठी गरजेचे आहे की जगभरातील सर्व माध्यमांनी खरी माहिती द्यावी."

सार्वजिनकरित्या हा डेटा उपलब्ध असणार नाही

हा डेटा फेब्रुवारीच्या सुरूवातीस ते एप्रिल अखेरचा आहे. या डेटामध्ये कोरोनामुळे मरण पावलेल्या आणि निरोगी झालेल्या रुग्णांचा समावेश आहे. या डेटानुसार हुबेई प्रांतात फेब्रुवारी महिन्यात कोरोनाची प्रकरणे वाढत असताना चीनने मतमोजणीच्या पद्धती अद्ययावत केल्या आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, विद्यापीठानं हा डेटा कसा गोळा केला हे अस्पष्ट आहे. आकडेवारीच्या ऑनलाईन आवृत्तीनुसार चीनचे आरोग्य मंत्रालय, राष्ट्रीय आरोग्य आयोग, मीडिया रिपोर्ट्स आणि इतर सार्वजनिक स्त्रोतांकडून ही आकडेवारी गोळा केली गेली आहे. फॉरेन पॉलिसी आणि 100 रिपोर्टर यांच्या वतीनं या डेटाचे सह-प्रकाशन केले जाणार असले तरी, सार्वजिनकरित्या हा डेटा उपलब्ध असणार नाही. मात्र कोरोना विषाणूच्या प्रसाराचा अभ्यास करणार्‍या संशोधकांसाठी हा डेटा तयार करण्यात आला आहे.

वाचा-जगातल्या या देशांमध्ये कोरोनाचा दुसरा उद्रेक होणार, शास्त्रज्ञांचा इशारा

चीनचा अधिकृत डेटा

याआधी गेल्या महिन्याच्या सुरूवातीस, वुहानमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत 50 टक्क्यांनी वाढ झाली. यामुळे त्याच्या अधिकृत कोरोना व्हायरस डेटाविषयी शंका निर्माण झाली. लीक झालेल्या डेटासेटमध्ये आणि चीनमध्ये कोरोना विषाणूशी संबंधित मृत्यूची संख्या वेगळी आहे की नाही हे बातमीपत्रात उघड झाले नाही. चीनने कोरोना विषाणूच्या 82,919 प्रकरणांसह 4,633 मृतांची नोंद झाल्याची अधिकृत माहिती दिली आहे.

वाचा-सलाम! 78 वर्षांची कोरोना योद्धा, सहकाऱ्यांनी टाळ्या वाजवून दिला शेवटचा निरोप

First published: May 18, 2020, 10:46 AM IST

ताज्या बातम्या