कोरोना योद्ध्यावर आली वाईट वेळ! पगार मागितला म्हणून गेली नोकरी, पोट भरण्यासाठी एक डॉक्टर झाला चायवाला

कोरोना योद्ध्यावर आली वाईट वेळ! पगार मागितला म्हणून गेली नोकरी, पोट भरण्यासाठी एक डॉक्टर झाला चायवाला

हरियाणामध्ये पगार मागितला म्हणून डॉक्टराला नोकरीवरून काढलं, पत्नीसोबत रस्त्यावर विकत चहा विकावा लागत आहे.

  • Share this:

करनाल, हरिणाया 18 मे : कोरोनामुळं देशभरात 31 मेपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. असे असले तरी कोरोनाबाधितांचा आकडा काही कमी होताना दिसत नाही आहे. कोरोना योद्धा असलेल्या डॉक्टर आणि पोलिसांनाही कोरोनाची लागण होत आहे. या परिस्थितीत हरियाणामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथं एक डॉक्टर रस्त्यावर आपल्या पत्नीसोबत चहा विकत आहेत. डॉक्टरांनी असा आरोप केला आहे की, ते रुग्णालयात पगार मागण्यासाठी गेल्यानंतर त्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आलं. पीडित डॉक्टरांचे नाव गौरव वर्मा असून करनाल येथील एक खासगी रुग्णालयात ते डॉक्टर आहेत.

गौरव वर्मा यांनी असा आरोप केला आहे की, 2 महिन्यांचा पगार न मिळाल्यामुळं त्यांनी वरिष्ठांकडे पगार देण्याची मागणी केली. तेव्हा प्रथम रुग्णालयानं त्यांची बदली केली, गौरव यांनी याचा विरोध केल्यानंतर त्यांना कामावरून काढून टाकण्यात आलं. त्यामुळं गौरव डॉक्टरांचे कपडे परिधान करूनच सेक्टर-13 जवळ चहा विकत आहेत. गौरव यांनी या प्रकरणाची तपासणी करण्यास सांगितलं आहे.

पीडित डॉक्टरांनी कंपनीच्या मुख्यालयातही याबाबत तक्रार केली होती. मात्र त्यांचे कोणी ऐकले नाही. त्यांनी सांगितले की, त्यांची बदली अचानक गाझियाबादला करण्यात आली होती. गौरव यांनी नकार दिल्यानंतर त्यांना नोकरीवरून काढून टाकलं. गौरव यांनी मुख्यमंत्र्यांकडेही याबाबत तक्रार केली होती.

वाचा-चीननं लपवला कोरोनाबाधितांचा आकडा? आतापर्यंतचा सर्वात मोठा डेटा आला समोर

प्रकरणाची चौकशी सुरू

सिव्हिल सर्जन डॉ. अश्विनी अहूजा यांनी सांगितलं की, याबाबत त्यांच्याकडं तक्रार आली असून, याबाबत चौकशी केली जाणार आहे. या प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर सविस्तर माहिती दिली जाईल.

वाचा-लॉकडाऊननंतरही कोरोनाचा कहर सुरूच, 24 तासांत 157 रुग्णांनी गमावले प्राण

रुग्णालय प्रशासनाने केली सारवासारव

रुग्णालयाचे युनिट प्रमुखांनी सांगितले की, लॉकडाऊनमुळं पगार देण्यास समस्या येत आहेत. डॉ गौरव यांनी दिलेलं विधान पूर्णपणे चुकीचं आहे. अनेक वेळा ते बेकायदेशीर कामे करीत असल्याचे आढळले, यासाठी तीन-चार नोटीस बजावल्या गेल्या आहेत व इशारे देण्यात आले आहेत. कंपनीचे वरिष्ठ अधिकारी त्यांना भेटायला गेले, पण डॉ गौरव शर्मा यांनी भेटण्यास नकार दिला. जर त्यांना काही समस्या असेल तर बसून हे प्रकरण सोडवले जाऊ शकते.

वाचा-आता रेड झोनमध्ये करता येणार ऑनलाईन शॉपिंग, होणार 'या' सामानाची डिलिव्हरी

First published: May 18, 2020, 11:24 AM IST

ताज्या बातम्या