Home /News /videsh /

चीनच्या शेजारी देशानं कोरोनाला हरवलं, लस किंवा औषध नाही तर 'हे' अस्त्र आलं कामी

चीनच्या शेजारी देशानं कोरोनाला हरवलं, लस किंवा औषध नाही तर 'हे' अस्त्र आलं कामी

लोकसंख्येने छोटा मात्र चीनच्या अगदी जवळ असलेल्या देशाकडे असे एक अस्त्र आहे जे कोणत्या देशाकडे नाही आहे.

    ताइपेइ, 11 मे : जगभरात कोरोनानं थैमान घातले आहे. कोरोनाला हरवण्यासाठी सर्व देश आपआपल्या परीनं लढा देत आहेत. यातच काही देशांनी याआधीच कोरोनावर विजय मिळवला आहे. अशाच एक चीनला अगदी लागून असणाऱ्या देशाचं सध्या विशेष कौतुक केलं जात आहे. हा देश आहे तैवान. तैवाननं लस किंवा औषधांच्या जोरावर नाही तर एका हुशार अस्त्राच्या जोरावर हे युद्ध जिंकलं. लोकसंख्येने छोटा असलेला तैवान हा देश चीनच्या अगदी जवळ आहे. तैवान आणि चीन दरम्यान बरेच लोक व्यवसाय आणि पर्यटनासाठी प्रवास करत असतात. यामुळं चीनमधून तैवानमध्ये कोरोनाचा प्रसार झाला. तैवानमध्ये कोरोना पसरण्याचा उच्च धोका होता परंतु वेगवेगळ्या प्रयत्नांमुळे त्यांनी या व्हायरसला रोखले. तैवानमध्ये आतापर्यंत कोरोना विषाणूची केवळ 440 प्रकरणे समोर आली आहेत. तर, आतापर्यंत 6 लोकांचा मृत्यू झाला आहे. यामागील प्रमुख कारण म्हणजे तैवाननं इतर देशांच्या तुलनेत लवकर खबरदारी घेण्यास सुरुवात केली. परदेशातून येणाऱ्या लोकांना पहिल्यापासून 14 दिवस क्वारंटाइन करण्यात आलं. वाचा-Coronavirus चा धोका : स्वच्छतेसह असा सुरक्षित आहार घ्या, WHO चा सल्ला मात्र तैवानकडे एक असं अस्त्र आहे, जे कदाचित जगातील कोणत्याच देशाकडं नाही आहे. ते म्हणजे तैवानचे उप-राष्ट्रपती. असं म्हंटलं जातं की तैवानचे उप-राष्ट्रपती हे कोरोनाचे एक्सपर्ट आहेत. अशी कोणतीच गोष्ट कोरोनाबाबतची नाही जी या उप-राष्ट्रपतींना माहित नाही. तैवानचे उप-राष्ट्रपती चेन चिएन-जेन यांनी अमेरिकेच्या जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठातून कोरोना विषाणूचा अभ्यास केला. कोरोनाला हरवण्यासाठी काय करावे लागेल याचे ट्रेनिंग घेतलं. विशेष म्हणजे उप-राष्ट्रपती असूनही तैवानमध्ये सत्तेत असलेल्या राजकीय पक्षाचा ते भाग नाही आहेत. वाचा-'लॉकडाऊनबाबत योग्य निर्णय घेतले म्हणून नाहीतर...', WHOनं केलं मोदी सरकारचं कौतुक उप-राष्ट्रपती चेन चिएन-जेन स्वत: देशातील संसर्गाच्या प्रसारावर लक्ष ठेवून आहेत. तसेच, लस तयार करुन किटची चाचणी करण्यावर ते जास्त जोर देत आहेत. दुसरीकडे, चेन आपल्या राजकीय पदावरून व्हायरसच्या प्रतिसादाबद्दल चीनवरही टीका करीत आहेत. तैवानने चीनवर सुरुवातीला कोरोनाशी संबंधित माहिती लपवल्याचा आरोप केला आहे. न्यूयॉर्क टाइम्सनं दिलेल्या वृत्तानुसार, एकीकडे देशरातील राज्यकर्ते कोरोनाचे राजकारण आणि विचित्र दावे करत असताना चेन मात्र विज्ञान आणि वस्तुस्थितीच्या जोरावर देश चालवत आहेत. वैद्यकीय कर्मचारी आणि शास्त्रज्ञही चेन यांच्याकडून सल्ला घेतात. 2003 मध्ये SARS विषाणूच्या उद्रेक दरम्यान चेन चिएन-जेन तैवानचे सर्वोच्च आरोग्य अधिकारी होते. यानंतरच त्यांनी साथीच्या रोगाविरुद्ध लढा देण्यासाठी देशाची तयारी सुरू केली. देशात आयसोलेशन वॉर्ड आणि व्हायरस संशोधन प्रयोगशाळेची बांधणी करण्यात आली. 68 वर्षीय चेन हे 2016 पासून उप-राष्ट्रपती पदावर कार्यरत आहेत. मुख्य म्हणजे त्यांच्या कार्यकाळ संपण्यासाठी काही दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. वाचा-अरे बापरे! शहरात तब्बल 334 कोरोना सुपर स्प्रेडर; नकळत पसरवत आहेत व्हायरस उप-राष्ट्रपती चेन चिएन-जेन हे 20 मे 2020 रोजी आपल्या पदांचा राजीनामा देतील. मात्र त्यांच्या कामाचा फायदा तैवानला होतच राहील. चेन यांनी याआधीच स्पष्ट केले होते की उप-राष्ट्रपती हे पद सोडल्यानंतर ते शैक्षणिक क्षेत्रात परत येतील आणि कोरोना विषाणूवरील संशोधनासाठी वेळ देतील. वाचा-चांगली बातमी! 45 वर्षे खाकी वर्दीसाठी तैनात असलेल्या योद्ध्याने कोरोनाला हरवलं संपादन, संकलन-प्रियांका गावडे.
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: Corona

    पुढील बातम्या