मराठी बातम्या /बातम्या /देश /45 वर्षे खाकी वर्दीसाठी तैनात असलेल्या योद्ध्याने कोरोनाला हरवलं, अधिकाऱ्यांनी फिल्मी स्टाइलने केलं Welcome

45 वर्षे खाकी वर्दीसाठी तैनात असलेल्या योद्ध्याने कोरोनाला हरवलं, अधिकाऱ्यांनी फिल्मी स्टाइलने केलं Welcome

'माझी सर्वांना विनंती आहे केली या आजाराला घाबरुन जाऊ नका, धाडसाने याच्याविरोधात लढा.’

'माझी सर्वांना विनंती आहे केली या आजाराला घाबरुन जाऊ नका, धाडसाने याच्याविरोधात लढा.’

'माझी सर्वांना विनंती आहे केली या आजाराला घाबरुन जाऊ नका, धाडसाने याच्याविरोधात लढा.’

इंदूर, 11 मे : देशभरात कोरोनाचा (Coronavirus) कहर वाढत असला तरी त्यातून बरे होण्याऱ्यांची संख्याही वाढत आहे. आतापर्यंत अनेक पोलीस कर्मचाऱ्यांना कर्तव्यावर असताना कोरोनाची लागण झाली आहे. चांगली बाब म्हणजे अधिकतर जणांनी या कोरोनाशी लढा जिंकला.

इंदूरमधील 62 वर्षीय सहाय्यक उप निरीक्षक भगवती चरण शर्मा यांना कर्तव्यावर असताना कोरोनाची लागण झाली. आरोग्याची तक्रार असतानाही त्यांनी कोरोनाला हरवलं.

भगवती यांना मधुमेहाचा त्रास आहे. मधुमेह वा हायपरटेंशन आदी आजार असणाऱ्यांना कोरोनातून बाहेर काढणं आव्हानात्मक असतं. मात्र अशाही परिस्थितीत त्यांनी न घाबरता कोरोनाशी लढा दिला आणि तो जिंकला. शनिवारी रात्री उशीर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. ते सुखरुप परतले याचा आनंद साजर करण्यासाठी पोलीस सहकाऱ्यांनी एकदम फिल्मी स्टाइनने त्यांना Welcome करण्याचं ठरवलं. अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या बेडच्या संगीताने त्यांचं स्वागत केलें. त्याशिवाय खुल्या जीपमध्ये भगवती यांना बसवलं आणि रस्ता भर त्यांच्यावर पुष्पवर्षा केली जात होती. घरपर्यंत त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला जात होता. त्यांच्या घराबाहेर रेड कार्पेट घालण्यात आले होते. पोलीस विभागाने केलेलं हं स्वागत पाहून भगवती यांना भरुन आलं.

यावेळी भगवती म्हणाले,  ‘मी गेल्या 45 वर्षांपासून पोलीस विभागात कार्यरत आहे. मात्र अशा स्वरुपाचं स्वागत कधीचं झालं नाही. पोलीस विभागातील अधिकारी यांनी माझं भव्य स्वागत केला याचा मला अत्यंत आनंद आहे. माझी सर्वांना विनंती आहे केली या आजाराला घाबरुन जाऊ नका, धाडसाने याच्याविरोधात लढा.’

संबंधित -अरे बापरे! शहरात तब्बल 334 कोरोना सुपर स्प्रेडर; नकळत पसरवत आहेत व्हायरस

विलगीकरण कक्षातच महिलेला शरीरसुखाची मागणी, महाराष्ट्रातील धक्कादायक घटना

First published:

Tags: Corona virus in india