Home /News /videsh /

कोरोनाचं नवं केंद्र झालं स्पेन! उप-पंतप्रधान पॉझिटिव्ह तर मृतांच्या शेजारी झोपतायत जवान

कोरोनाचं नवं केंद्र झालं स्पेन! उप-पंतप्रधान पॉझिटिव्ह तर मृतांच्या शेजारी झोपतायत जवान

स्पेनमध्ये कोरोनाचा हाहाकार, देशाच्या जवानांवर मृतदेहाच्या शेजारी झोपण्याची वेळ.

    माद्रिद, 26 मार्च : कोरोनाव्हायरसची सर्वाधिक प्रकरणे असलेला स्पेन जगातील चौथा देश आहे. तर, मृतांच्या बाबतीत स्पेनने चीनलाही मागे टाकले आहे. स्पेनमध्ये 49 हजार 515 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 3 हजार 647 लोकांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. आता स्पेनच्या उप-पंतप्रधान कारमेन कॅल्व्हो यांनाही कोरोना संसर्ग पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. इटलीनंतर स्पेनमध्ये सध्या भयावह परिस्थिती आहे. 24 मार्च रोजी कारमेन कॅल्वो यांची तपासणी करण्यात आली होती. 25 मार्च रोजी रात्री रिपोर्ट आल्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळले आहे. 62 वर्षीय कारमेन कॅल्व्हो चार दिवसांपासून आजारी होत्या, त्यामुळे त्या 14 दिवस क्वारंटाईनमध्ये होत्या. कॅल्व्हो पॉझिटिव्ह आढळल्याने त्यांच्या कुटुंबाला आणि कर्मचार्‍यांनाही वेगळे ठेवण्यात आले आहे. वाचा-ट्रकवर उभारले जातेय शवगृह, लवकरच 'या' शहरात पडणार मृतांचा खच मृतांशेजारी झोपतायत लोक कोरोनाव्हायरसने स्पेनमध्ये थैमान घातले आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे रुग्णालयात पुरेशा सुविधा नाही आहेत. त्यामुळे सैनिकांना आणि संसर्ग झालेल्या लोकांना मृतदेहांशेजारीच रहावे लागत आहे. सध्या उपाययोजना आणि सैनिकांच्या सुरक्षेबाबत न्यायालयीन चौकशी सुरू केली आहे. संरक्षणमंत्री मार्गरीता रोबल्स यांनी, वृद्ध लोक एकतर स्वत: कडे लक्ष देऊ शकत नाहीत. त्यामुळे जवानांना त्यांना मदत करावी लागते. काहीजणांचे मृतदेह सडले आहेत. त्यामुळं वृद्ध लोकांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहे, असे सांगितले. वाचा-वुहानपेक्षा 'या' शहरात भयंकर परिस्थिती, दर मिनिटाला जातोय एकाचा जीव वृद्धाश्रमातून 19 मृतदेह सापडले यापूर्वी माद्रिदमधील माँटे हर्म्स वृद्धाश्रमातून 19 मृतदेह सापडले होते. यानंतर स्पेनमधील सेवानिवृत्त घरांच्या स्थितीबद्दल प्रश्न उपस्थित करण्यात आले. या वृद्धाश्रमात 130हून अधिक लोक राहत होते, त्यापैकी 70 जणांना कोरोनाची लागण झाली होती. असे सांगितले जात आहे की 19 मृतदेहांपैकी 15 जणांचा कोरोनामधून मृत्यू झाला आहे. वाचा-धक्कादायक! शहर लॉकडाऊन असल्यामुळे दारूची सोय नाही, इसमाचा मृत्यू माद्रिद आणि लंडनमध्येही मृतांची संख्या वाढली इटलीतील लोंबार्दियानंतर स्पेनमधील माद्रिद आणि ब्रिटनमधील लंडन आता कोरोनाची मोठी केंद्रे आहेत. येथे कोरोनामधील मृत्यूची संख्या खूप वेगवान वाढत आहे. या शहरांमध्ये दुप्पटीने मृत्यू दर वाढत आहे. फायनान्शियल टाईम्सच्या अहवालानुसार लंडनमधील मृतांची संख्या दुप्पट वाढत आहे. एका आठवड्यात सहापट जास्त मृत्यू होत आहेत.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Corona

    पुढील बातम्या