परभणी, 26 मार्च : संपूर्ण राज्यामध्ये कोरोनाच्या फैलावामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. या आजारावर मात करण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. पण तरीदेखील लोक टवाळक्या करण्यासाठी घराबाहेर पडतात. अशात परभणीमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहरातील रेल्वे स्थानक परिसरामध्ये, बेघर इसमाचा मृतदेह आढळून आला आहे. उपासमार आणि दारू न मिळाल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
परभणी शहरातील रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या, कुंजबिहारी हॉटेलच्या बाजुला, 40 ते 50 च्या दरम्यान वय असलेल्या इसमचा आज सकाळी मृतदेह आढळला. आजूबाजूच्या परिसरातील लोकांकडे चौकशी केली असता, त्याला दारूचे व्यसन असल्याचे समजते. मागील चार ते पाच दिवसापासून परभणी शहरातील दारूची दुकाने बंद असल्याने त्याला दारू मिळू शकली नाही. सोबत उपासमार या दोन्हीमुळे, त्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
सकाळच्या सुमार स्थानिकांनी हा मृतदेह पाहिला आणि याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत व्यक्तीचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. दरम्यान पोलीस सध्या पुढील प्रकरणाचा तपास करत आहेत.
कोरोना होईल या भीतीने दोघांची आत्महत्या
कोरोनाची दहशत इतकी मोठी आहे की लोकांची चिंता वाढली आहे. अशात काहींनी आत्महत्या करण्याचं टोकाचं पाऊल उचललं. एकीकडे कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. कोरोना होईल या भीतीनं दोन जणांनी आपलं आयुष्य संपवलं. गाझियाबाद जवळील हापूड इथे ही घटना घडल्याचं समोर आलं. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली.
पिलखुआ पोलीस ठाणा क्षेत्रातील एका तरुणाला आपल्याला कोरोनाची लागण झाल्याचा संशय आला आणि त्याने भीतीनं ब्लेडनं वार करून आत्महत्या केली. तर बरेली इथे एका तरुणानं कोरोनाच्या भीतीनं ट्रेन खाली येऊन आत्महत्या केली. दोन्ही तरुणांना काही दिवसांपासून ताप आणि घशाचा त्रास होता.
Published by:Manoj Khandekar
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.