रोम, 26 मार्च : चीनच्या वुहानपासून सुरू झालेल्या कोरोनाने 175 देशांना विळखा घातला आहे. दिवसेंदिवस परिस्थितीत बिकट होत चालली आहे. सध्या सगळ्यात चीनहून सगळ्यात जास्त परिस्थिती चिंताजनक आहे ती इटलीची. एकीकडे चीनमध्ये रुग्ण निरोगी होत असताना इटलीमध्ये मात्र मृतांच्या संख्येत वाढ होत आहे. इटलीमध्ये आतापर्यंत 7,503 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, जगभरात सध्या 4 लाखहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे तर 21 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. चीनच्या वुहानमध्ये ज्या प्रमाणे हा विषाणू वाऱ्यासारखा पसरला अशीच परिस्थिती इटलीतील लोंबार्दिया येथे झाली आहे. इटलीमधील या शहरात 3500हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळं लोंबार्दिया शहरातील परिस्थिती भयंकर आहे. लोंबार्दिया शहराने चीनलाही मागे टाकले आहे. चीनच्या हुबेई प्रांतात 3160 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. यापैकी एकट्या वुहान शहरातील 2500 रुग्ण होते. आता लोंबार्दिया या शहरात मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे. मृतांचा आकडा प्रत्येक तिसर्या दिवशी दुपटीने वाढत आहे. वाचा- डॉक्टरांचा दावा, भारतात कोरोनामुळे नाही वाढणार मृतांची संख्या, कारण…. इटलीमध्ये कोरोनाच्या नव्य़ा प्रकरणात 8% वाढ इटलीमध्ये कोरोनाने हाहाकार माजला असताना एक आनंदाची बातमी म्हणजे कोरोनाच्या नवीन रुग्णांची वाढ येथे झालेली नाही. कोरोनाच्या केवळ 8% नवीन प्रकरणे समोर आली आहेत. इटलीमध्ये 21 फेब्रुवारी रोजी कोरोनामुळे पहिला मृत्यू झाला होता. त्यानंतर पहिल्यांदाच ही संख्या कमी झाली आहे. वाचा- लॉकडाऊनमुळे त्रस्त आहात, चिडचिड नको असे पॉझिटिव्ह राहा माद्रिद आणि लंडनमध्येही मृतांची संख्या वाढली लोंबार्दियानंतर स्पेनमधील माद्रिद आणि ब्रिटनमधील लंडन आता कोरोनाची मोठी केंद्रे आहेत. येथे कोरोनामधील मृत्यूची संख्या खूप वेगवान वाढत आहे. या शहरांमध्ये दुप्पटीने मृत्यू दर वाढत आहे. फायनान्शियल टाईम्सच्या अहवालानुसार लंडनमधील मृतांची संख्या दुप्पट वाढत आहे. एका आठवड्यात सहापट जास्त मृत्यू होत आहेत. वाचा- पुणेकरांसाठी Good News! 24 तासांत 5 जण कोरोनामुक्त, 48 तासांत एकही रुग्ण नाही कोरोनाचा मृत्यू दर झाला कमी चीनच्या वुहानपासून सुरू झालेल्या विषाणूनचे जगातील तब्बल 175 देशांना विळखा घातला. प्रत्येक देश कोरोनापासून वाचण्यासाठी उपाययोजना करत आहे. यामुळं सध्या जवळजवळ संपर्ण जग लॉक डाऊन झाले आहे. जगभरात कोरोनामुळे 21 हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. असे असले तरी जगभरात 1 लाखाहून अधिक रुग्ण बरे झाले आहे. यात चीनमध्ये 74 हजार 051 रुग्ण बरे झाले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







