न्यूयॉर्क, 26 मार्च : कोरोनाव्हायरसमुळे सध्या महासत्ता असलेल्या अमेरिकेत भीतीचे वातावरण आहे. दररोज कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढत आहे. न्यूयॉर्कमध्ये सर्वात वाईट परिस्थिती आहे. एकट्या न्यूयॉर्कमध्ये 30 हजारहून अधिक कोरोना रुग्ण आहेत. दर तिसर्या दिवशी रुग्णांची संख्या दुपटीने वाढत आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार, येत्या काही दिवसांत शेकडो लोकांचा मृत्यू होण्याची शक्याता आहे. त्यामुळे न्यूयॉर्कमध्ये सध्या कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या रुग्णांचे मृतदेह वेगळे ठेवण्याची तयारी सुरू आहे. तंबू आणि ट्रकवर बनवले शवगृह सीएननने दिलेल्या माहितीनुसार, न्यूयॉर्कमधील अनेक हॉस्पिटलमध्ये तंबू आणि रेफ्रिजरेटेर बांधले जात आहे. तेथील मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी, परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. न्यूयॉर्कमध्ये आपत्कालीन परिस्थितीची घोषणा यापूर्वीच करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, 9/11 च्या हल्ल्यानंतर आता असे शवगृह तयार केले जात आहे. मुख्य म्हणजे कोरोनाग्रस्त रुग्णाच्या मृत्यूनंतर हे मृतदेह वेगळे ठेवले जातात. जेणेकरून हा संसर्ग आणखी पसरू नये, भारतात अशा मृतदेहांचे पोस्टमार्टम केले जात नाहीत. भारतात मृतदेह दफन करण्यासाठी मार्गदर्शक सूचनाही देण्यात आल्या आहेत. वाचा- सावधान! फक्त 20 मिनिटांत पसरतोय कोरोना, घरातच थांबा नाहीतर… अमेरिकेच्या अधिका-यांच्या म्हणण्यानुसार, न्यूयॉर्कबरोबरच उत्तर कॅरोलिनामध्येही तंबू आणि ट्रकवर शवगृह तयार केले जात आहे. आतापर्यंत अमेरिकेत 900 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. असे म्हटले जात आहे की येत्या काही दिवसांमध्ये न्यूयॉर्कमध्ये व्हेंटिलेटरची कमतरता देखील असू शकते. अमेरिकेत, 20 टक्के पेक्षा जास्त रुग्ण आयसीयूमध्ये दाखल आहेत. आणि यापैकी 80 टक्के रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. वाचा- वुहानपेक्षा ‘या’ शहरात भयंकर परिस्थिती, दर मिनिटाला जातोय एकाचा जीव न्यूयॉर्क होणार दुसरे वुहान? दुसरीकडे, जागतिक आरोग्य संघटनेने असे म्हटले आहे की अमेरिका संपूर्ण जगासाठी कोरोना विषाणूचे नवीन केंद्र बनले आहे. चीनच्या वुहाननंतर या शहरात सर्वाधिक मृत्यू होऊ शकतात. न्यूयॉर्कची लोकसंख्या सुमारे 8 दशलक्ष आहे. अलीकडेच येथे कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे 150 पेक्षा जास्त मृत्यू झाले आहेत. ताज्या आकडेवारीनुसार अमेरिकेत आतापर्यंत 65 हजार लोकांना कोरोनाचा लागण झाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







