Home /News /videsh /

पुन्हा चीन हादरलं! 36 दिवसांनी वुहानमध्ये कोरोनाची एण्ट्री, लक्षणं नाही तरी रिपोर्ट पॉझिटिव्ह

पुन्हा चीन हादरलं! 36 दिवसांनी वुहानमध्ये कोरोनाची एण्ट्री, लक्षणं नाही तरी रिपोर्ट पॉझिटिव्ह

उत्तर पश्चिम चीनमधील गांसू प्रांतातील लान्झोउमध्ये लोकांना या आजाराचा संसर्ग झाला आहे. लान्झोउ वेटरीनरी रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये डिसेंबरमध्ये या आजाराच्या अँटीबॉडीची सूचना चीन सरकारला दिली होती.

उत्तर पश्चिम चीनमधील गांसू प्रांतातील लान्झोउमध्ये लोकांना या आजाराचा संसर्ग झाला आहे. लान्झोउ वेटरीनरी रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये डिसेंबरमध्ये या आजाराच्या अँटीबॉडीची सूचना चीन सरकारला दिली होती.

लॉकडाऊन हटवल्यानंतर पुन्हा कोरोनानं चीनमध्ये केली एण्ट्री, कोरोनाचं केंद्र झालेल्या वुहानमधून आली वाईट बातमी.

    बीजिंग, 12 मे : कोरोनाचं मुळ मानल्या जाणाऱ्या चीननं या व्हायरसला हरवल्याचं काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं. मात्र आता कोरोनानं पुन्हा चीनमध्ये शिरकाव करण्यास सुरुवात केली आहे. रशियाच्या सीमेवर असलेल्या शुलान शहरात (Shulan City) क्लस्टर स्वरूपाचे कोरोना संक्रमण होत असल्याचं समोर आलं आहे. एवढंच नाही तर कोरोनाचे क्रेंद मानल्या जाणाऱ्या वुहानमध्येही कोरोनाची प्रकरणे समोर येत आहेत. तब्बल 36 दिवसांनी वुहानमध्ये पुन्हा कोरोनाची प्रकरणं आढळून आली. सध्या वुहानमध्ये 5 नवीन कोरोनाची प्रकरणं समोर आली. यामुळं चीन सरकारचे धाबे दणाणले आहेत. वुहानमध्ये पुन्हा कोरोनाची प्रकरणं समोर आल्यानंतर सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षानं स्थानिक अधिकाऱ्यांना निलंबित केलं आहे. सरकारी माध्यमांनी दिलेल्या माहितीत वुहानच्या सुन्मीन रहिवासी समुदायात बदल झाल्यानंतर चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाच्या चांगचिंग स्ट्रीट वर्किंग कमिटीचे सचिव झांग युजिन यांना या पदावरून काढून टाकण्यात आले आहे. हुबेई प्रांताची राजधानी वुहानमधील सुन्मीन निवासी समाजात संसर्गाची ही सर्व प्रकरणे आढळली आहेत. हा परिसर चांग्किंगच्या कार्यक्षेत्रात येतो. शिन्हुआ या वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार, निवासी संकुलाचे योग्य व्यवस्थापन न केल्यामुळे झांग यांना पदावरून काढून टाकले गेले आहे. या ठिकाणी पहिल्यांदा संसर्गाच्या 20 घटना समोर आल्या होत्या. वाचा-कोरोनाला हरवणं शक्य! येत्या काही महिन्यात लस मिळण्याची शक्यता, WHOनं दिले संकेत गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये चीनच्या वुहानमधून कोरोनाचा उद्रेक होण्यात सुरुवात झाली. त्यानंतर तब्बल तीन महिन्यांनी कोरोनावर मात करण्यात चीनला यश आले. चीनमध्ये 82 हजार 918 कोरोनाची प्रकरणे समोर आली होती. मात्र त्यातील 78 हजारहून अधिक लोकं निरोगी होती. त्यामुळं चीनमधील सर्व शहरांतील लॉकडाऊन हटवण्यात आला होता. वाचा-मुंबईकरांसाठी चांगली बातमी, कोरोनाला रोखण्यासाठी पालिका देणार 'हे' औषध वुहानमध्ये समोर आली 5 नवीन प्रकरणं एएफपी वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार वुहानमधील 89 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. मुख्य म्हणजे या व्यक्तीमध्ये पहिले Covid-19ची लक्षणं आढळली नव्हती. शनिवारी वुहानमध्ये पुन्हा कोरोनाचे पहिलं प्रकरण समोर आलं होतं. आता आणखी 4 लोकांचा कोरोनाची लागण झाल्याचे समोर आलं आहे. त्यामुळं आता पुन्हा वुहानमध्ये 20 हजार लोकांची कोरोनाची चाचणी करण्यात येणार आहे. ज्या लोकांची चाचणी करण्यात येणार आहे त्यातील 5 हजार लोक सुन्मीन निवासी समाजातील आहेत. वाचा-हेरगिरीने पकडणार कोरोनाचे रुग्ण; या देशात तब्बल 6000 टीम तैनात चीनमध्ये गेल्या एका महिन्यांत एकही मृत्यू नाही आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार 14 रुग्णांमधील 2 रुग्ण परदेशी आहेत. गेल्या एका महिन्यापासून चीनमध्ये एकाचाही मृत्यू झाला नाही आहे. एकूण मृतांची संख्या ही 4 हजार 633 आहे. सध्या चीनमधील काही भाग वगळता इतर सर्व शहरांतील लॉकडाऊन हटवण्यात आला आहे. वुहानमध्ये सर्वात आधी जाहीर केला लॉकडाऊन चीनमध्ये सर्वात आधी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. हा लॉकडाऊन हुबई प्रांतातील वुहान या शहरात पहिल्यांदा लागू करण्यात आला. याचे कारण म्हणजे कोरोनाची सुरुवात या शहरातून झाली. मार्च अखेरीस वुहानमधील लॉकडाऊन शिथिल करण्यात आला. वाचा-कोरोनाच्या संकटात एक आनंददायी बातमी; गावी परतणाऱ्या ट्रेनमध्ये एका मुलीचा जन्म संपादन, संकलन-प्रियांका गावडे.
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: Corona

    पुढील बातम्या