वॉशिंग्टन, 12 मे : कोरोनानं जगात थैमान घातलं आहे. तरी अद्याप कोरोनावर लस शोधण्यात कोणत्याही देशाला यश आलेलं नाही आहे. इस्राइलनं दावा केला असला तरी, मानवावर या लसीची चाचणी करण्यात आलेली नाही. या सगळ्यात आता कोरोनाव्हायरस संसर्गाची लस लवकरच मिळणार असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) महासंचालक टेड्रॉस अॅडॅनॉम यांनी संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेला दिली. यावेळी त्यांनी लवकरच कोरोनावर लस मिळेल असंही सांगितलं. टेड्रॉस यांनी सांगितलं की, सध्या एकूण 7 ते 8 टीम ही लस तयार करण्याच्या अगदी जवळ आहे आणि लवकरच जगाला एक चांगली बातमी मिळेल.
टेड्रॉस यांच्या म्हणण्यानुसार बर्याच देशांनी मदतीचा हात पुढे केला आहे आणि सुमारे 100 वेगवेगळ्या टीम लसीची चाचणी घेत आहेत आणि त्यातील 8 लसीचा शोध घेण्याच्या अगदी जवळ आले आहेत. दोन महिन्यांपूर्वी, WHOने अंदाज वर्तवला होता की, लस तयार होण्यास 12 ते 18 महिने लागू शकतात, परंतु काम वाढले आहे आणि ते वेळेआधीच विकसित केली जाईल. यावेळी टेड्रॉस यांनी देशांना विनंती केली आहे की त्यांनी संशोधन आणि संशोधनासाठी सुमारे 8 अब्ज डॉलर्सची गरज आहे. लस तयार झाल्यानंतर, मोठ्या प्रमाणात त्याचं उत्पादन देखील आवश्यक असेल, म्हणून ही रक्कम कमी आहे. टेड्रोस यांनी सांगितले की यापूर्वी त्यांनी या संदर्भात 40 देशांना आवाहन केलं आहे.
वाचा-मुंबईकरांसाठी चांगली बातमी, कोरोनाला रोखण्यासाठी पालिका देणार 'हे' औषध
WHOला संशोधनासाठी पैशांची गरज
WHO प्रमुख म्हणाले की, 8 अब्ज डॉलर्स पुरेसे नाहीत, आम्हाला आणखी काही मदतीची आवश्यकता आहे. जर यामुळे मदत होत नसेल तर लस तयार करण्याचे काम सतत उशिरा होईल. WHO ची इच्छा आहे की ही लस काही लोकांपर्यंत न पोहचता प्रत्येक देशापर्यंत पोहचली पाहिजे. टेड्रॉस यांनी लसीविषयी माहिती दिली की, अशा टीमवर जास्त लक्ष केंद्रीत केलं जात आहे जे शोध घेण्याच्या जास्त जवळ आहेत. मात्र टेड्रॉस यांनी या संघाची नावे जाहीर करण्यास नकार दिला.
वाचा-हेरगिरीने पकडणार कोरोनाचे रुग्ण; या देशात तब्बल 6000 टीम तैनात
प्राण्यांवर चाचणी करण्यास सुरुवात
टेड्रॉस यांनी असेही सांगितले की, गेल्या जानेवारीपासून जगभरातील हजारो संशोधकांसोबत काम सुरू आहे. बहुतेक लस प्राण्यांवर वापरण्यास सुरवात करतात, तर काहींनी मानवी चाचण्या देखील सुरू केल्या आहेत. सुमारे 400 शास्त्रज्ञांची एक टीम या संपूर्ण कामावर नजर ठेवून आहे. टेड्रॉस म्हणाले की कोरोना संसर्ग खूप धोकादायक आहे आणि लसीशिवाय आपणया लढाईत अगदी कमकुवत स्थितीत असू. ते म्हणाले की, कोरोनानं सर्व देशांना शिकवले की, प्रत्येक देशाला मजबूत आरोग्य सेवा आवश्यक आहे.
वाचा-परग्रहांवरून पृथ्वीवर येऊ शकतो नवा व्हायरस, तज्ज्ञांनी केलं सावध
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.