Home /News /national /

कोरोनाच्या संकटात एक आनंददायी बातमी; गावी परतणाऱ्या मजुरांच्या ट्रेनमध्ये एका मुलीचा झाला जन्म

कोरोनाच्या संकटात एक आनंददायी बातमी; गावी परतणाऱ्या मजुरांच्या ट्रेनमध्ये एका मुलीचा झाला जन्म

विविध राज्यांमध्ये मोठ्या संख्येने मजूर आपल्या गावी परतत आहेत. त्यातच एक आनंद देणारी बातमी समोर आली आहे.

    प्रयागराज, 11 मे : कोरोना व्हायरसचा (Coronavirus) संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन सुरु आहे. उत्तर प्रदेशातील अनेक कामगार आणि श्रमिक सध्या दुसऱ्या राज्यात अडकले आहेत. ते त्या त्या राज्यातून घरी येण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशा सगल्यां साठी उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने महाअभियान सुरु केले आहे. रेल्वेच्या सहकार्याने श्रमिक विशेष रेल्वे चालण्यात येत आहेत. यातून देशभरातून लोक उत्तर प्रदेशातील आपआपल्या जिल्ह्यात परत आहेत. अशाच एका ट्रेनमध्ये सोमवारी एका महिलेने मुलीला जन्म दिला. नैनी आणि प्रयागराज स्टेशनदरम्यान मुलीचा जन्म नैनी आणि प्रयागराज स्टेशनांच्यादरम्यान ट्रेनमध्ये या मुलीचा जन्म जाला आहे. यानंतर प्रयागराज स्टेशनवर ट्रेन पोहचल्यानंतर रेल्वे डॉक्टर शालिनी सिंह यांनी आई आणि मुलीची आरोग्य तपासणी केली. डॉ शालिनी यांच्या सांगण्यानुसार आई आणि मुलगी दोघांचीही प्रकृत्ती उत्तम आहे. यानंतर रेल्वे रुग्णवाहिकेद्वारे आई आणि मुलीला महिला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार महिलेचे नाव सोनी मिश्रा आहे आणि त्या आशीष मिश्रा यांच्या पत्नी आहेत. सोनी मिश्रा ट्रेन क्रमांक 09705 मध्ये सूरतहून उ. प्रदेशाकडे निघाल्या होत्या. 3 वाजून 35 मिनिटांनी ही ट्रेन प्रयागराज स्टेशनवर पोहोचली. या दरम्यानच या महिलेने मुलीला जन्म दिला. हा परिवार प्रयागराज परिसरातील दहिया येथील रहिवासी आहेत. एका दिवसात 3 श्रमिक विशेष रेल्वेतून 3500 प्रवासी पोहोचले. प्रयागराज जंक्शन या स्टेशनवर सोमवारी 3 श्रमिक विशेष रेल्वे पोहोचल्या. गुजरातच्या नवसारीयेथून 24 डब्ब्यांची स्पेशल ट्रेन 09645 सकाळी 08.40 वाजता पोहोचली. या रेल्वेत एकूण 1178 प्रवासी होते. सर्व प्रवाशांना बसमधून त्यांच्या घरी पोहोचवण्याची व्यवस्था करण्यात आली. त्यानंतर सूरतहून सुटलेली 22 डब्ब्यांची विशेष रेल्वे 09705 दुपारी 03.35 वाजता पोहोचली. यातून सुमारे 1200 प्रवासी प्रयागराजमध्ये पोहोचले. तर पुण्यातून आलेली 24 डब्ब्यांची 01960 विशेष रेल्वे सात वाजता पोहोचली. यातूनही सुमारे 1200 प्रवासी उ. प्रदेशात दाखल झाले. सर्व प्रवाशांची थर्मल तपासणी केल्यानंतर त्यांना त्यांच्या गावी रवाना करण्यात आले. हे वाचा - #PGStory : 'सामानाबरोबर माझा पतीही चोरलास...', सुरा घेऊन माझ्या मागे धावत होती
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    पुढील बातम्या