अंकारा, 12 मे : कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) सर्वाधिक प्रभावित इस्लामिक देश तुर्की सरकारने कोरोनाशी दोन हात करण्यासाठी वेगळ्याच पद्धतीचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला आहे. येथे डॉक्टर आणि मेडिकल कर्मचाऱ्यांच्या हेरगिरी किंवा डिटेक्टिवच्या टीमचे गठन केले आहे. वृत्त संस्था एएफपीअनुसार देशभरात कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी तुर्की सरकारने आरोग्य मंत्रालयाअंतर्गत 4 ते 5 लोकांच्या 6000 टीम तयार केल्या आहेत.
कोरोनामुळे तुर्की (Turkey) सध्या इस्लामिक देशांमध्ये सर्वाधिक प्रभावी देश आहे. मात्र तुर्कीने 11 मे रोजी लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्याची घोषणा केली होती. कारण त्यांच म्हणणं आहे की त्यांची हेरगिरी करणारी टीम आपलं काम चांगल्या प्रकारे करीत आहेत. ही टीम मिळालेल्या माहितीनुसार रुग्णांचा तपास करीत घरा-घरांमध्ये हेरगिरी करते.
कसे केले जाते काम?
ही टीम संशयितांचा शोध घेण्यासाठी लोकांच्या घरोघरी जातात. त्यानंतर त्यांचा तपास करतात. त्यात ते पॉझिटिव्ह आल्यानंतरही त्यांची हेरगिरी सुरूच असते. पॉझिटिव्ह रुग्णांमार्फत आजाराचा फैलाव होऊ नये हा त्यामागी प्रयत्न असल्याचे सांगितले जात आहे.
काही कार्यकर्त्यांकडून सरकारने सुरू केलेल्या या टीमचा विरोध केला जात आहे. सरकारने नागरिकांची हेरगिरी करीत असून त्यातून जनतेचा डेटा जमा केला जात असल्याचाही आरोप केला जात आहे. सध्या या देशात 1 लाख 37000 जणांना कोरोनाची लागण झाली असून मृतांची संख्या इराणच्या तुलनेत कमी आहे.
संबंधित-पाकिस्तानात महिलांकडून ब्लॅकमेलिंग; पुरुष झाले पीडितएक आनंददायी बातमी; 21 लहानग्या बाळांची कोरोनावर मात, 20 दिवसांची छकुली झाली बरी
Published by:Meenal Gangurde
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.