बीजिंग 21 फेब्रुवारी : एकिकडे चीनने (China) गुरुवारी दिवसभरात कोरोनाव्हायरसचा (Coronavirus) एकही नवा रुग्ण सापडला नाही,अशी घोषणा केली. यानंतर चीनने सुटकेचा निश्वास टाकला असावा. मात्र दुसरीकडे चीननंतर आता इटली (Italy) आणि इराणमध्ये (Iran) कोरोनाव्हायरसने थैमान घातलं आहे. या दोन देशांमध्ये इतक्या भरपूर प्रमाणात हा व्हायरस पसरण्याची नेमकी कारण काय आहेत ती जाणून घेऊयात. इटली चीननंतर कोरोनाव्हायरसमुळे सर्वाधिक मृत्यू कोणत्या देशात झाले असतील, तर ते इटलीत. यामुळे इटली पूर्णपणे लॉकडाऊन करण्यात आला आहे. इटलीमध्ये सर्वाधिक मृत्यू होण्याचं प्रमाण यासाठी आहे. कारण याठिकाणी वयस्कर व्यक्तींची लोकसंख्या जास्त आहे आणि कोरोनाव्हायरस वृद्ध व्यक्ती आणि उच्च रक्तदाब, मधुमेही रुग्णांसाठी जास्त धोकादायक आहे, असं एका अभ्यासात दिसून आलं. हे वाचा - आता ‘हा’ देश कोरोनाचा पुढचा लक्ष्य, एकाच शहरात दिवसभरात तब्बल 1 हजार रुग्ण इटलीमध्ये सुरुवातीलाही कोरोनाव्हायरसच्या तपासणीकडे फारसं लक्ष दिलं जात नव्हतं, असं सांगितलं जातं आहे. चीनमध्ये कोरोनाव्हायरस पसरल्यानंतर इतर देशांप्रमाणे इटलीने खबरदारीही घेतली नव्हती. ज्यामुळे हा आजार झपाट्याने पसरला. सार्वजनिक आरोग्य प्रणालीही सक्षम नसल्याचं बोललं जातं. त्यात डॉक्टरांनाही या आजाराची लागण होत असल्याच्या बातम्या येत आहेत. इटलीच्या उत्तर भागात सर्वात जास्त प्रकरणं आहेत कारण इथं देशाची सर्वात जास्त व्यापारी केंद्रे आहेत. या ठिकाणी चीनसह जास्त व्यापार होतो.वुहानमधून कोरोनाव्हायरस पसरल्यानंतरही इथं चीनी नागरिकांच्या प्रवासावर बंदी घालण्यात आली नाही. युरोपमधील इतर देशांतील लोकंही सर्वात जास्त इथंच येतात. उत्तर इटलीतूनच हा व्हायरस युरोपमध्ये पसरला. हे वाचा - इतर देशांच्या तुलनेत भारतात ‘कोरोना’चा कमी प्रसार; घाबरू नका, मात्र काळजी घ्या इराण पश्चिम आशियातील इराणही कोरोनाव्हायरशी लढतो आहे. इराणमधील चीनी सोलर प्लांट यासाठी कारणीभूत मानलं जातं. इराणच्या कोम शहरात हा प्लांट आहे, जिथं सर्वात जास्त चीनी नागरिक काम करतात. चीनमध्ये कोरोनाव्हायरस पसरल्यानंतरही चीनी नागरिकांचं येणंजाणं सुरूच होतं. इराण हे जागतिक इस्लामिक धार्मिक केंद्रही आहे. जगभरातील लोकं इथं धार्मिक कारणासाठी येतात. इराणने खूप उशिराने या धार्मिक प्रवासावर बंदी घातली. इराणमध्ये वैद्यकीय व्यवस्थाही मजबूत नाही. कोरोना पसरल्यानंतर या देशात टेस्टिंग किटपासून मास्कपर्यंत सर्वाचीच कमतरता दिसली. हे वाचा - 103 वर्षांच्या आजीची महाभयंकर ‘कोरोना’वर मात, लाखो रुग्णांसाठी प्रेरणा
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.