मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

याला म्हणतात जिद्द! 103 वर्षांच्या आजीची महाभयंकर 'कोरोना'वर मात, लाखो रुग्णांसाठी प्रेरणा

याला म्हणतात जिद्द! 103 वर्षांच्या आजीची महाभयंकर 'कोरोना'वर मात, लाखो रुग्णांसाठी प्रेरणा

कोरोनाव्हायरसचा (coronavirus) सर्वाधिक धोका हा वृद्ध व्यक्तींना आहे, असं अनेक अभ्यासातून समोर आलं. असं असताना या विषाणूवर मात करणाऱ्या या वृद्ध व्यक्ती नवा आशेचा किरण आहेत.

कोरोनाव्हायरसचा (coronavirus) सर्वाधिक धोका हा वृद्ध व्यक्तींना आहे, असं अनेक अभ्यासातून समोर आलं. असं असताना या विषाणूवर मात करणाऱ्या या वृद्ध व्यक्ती नवा आशेचा किरण आहेत.

कोरोनाव्हायरसचा (coronavirus) सर्वाधिक धोका हा वृद्ध व्यक्तींना आहे, असं अनेक अभ्यासातून समोर आलं. असं असताना या विषाणूवर मात करणाऱ्या या वृद्ध व्यक्ती नवा आशेचा किरण आहेत.

  • Published by:  Priya Lad
तेहरान, 19 मार्च  : कोरोनाव्हायरचा (Coronavirus) सर्वाधिक धोका वयस्कर व्यक्तींना (old people) आहे. असं असतानाही तब्बल 103 वर्षांच्या आजीने हार मानली नाही. जगाला दहशतीत ठेवणाऱ्या महाभयंकर अशा कोरोनाव्हायरशी त्यांनी फक्त लढाच दिला नाही, तर त्याला हरवलंही आहे. इराणमध्ये (Iran) 103 वर्षांची कोरोनाग्रस्त महिला पूर्णपणे बरी झाल्याची बातमी, IRNA या वृत्तसंस्थेने दिली आहे. हे वाचा - 'कोरोना'शी लढताना... भारतातील पहिल्या रुग्णाची व्हायरसवर मात, शेअर केला अनुभव सेमनन (Semnan) येथील रुग्णालयात या महिलेवर उपचार सुरू होते. सेमनन युनिव्हर्सिटी ऑफ मेडिकल सायन्सचे (Semnan University of Medical Sciences) प्रमुख नवीद दनायी यांनी ही महिला पूर्णपणे बरी झाल्यानंतर तिला डिस्चार्ज देण्यात आल्याचं सांगितलं, असं IRNA  ने म्हटलं आहे. महाभयंकर अशा कोरोनाव्हायरवर मात करणारी इराणमधील ही दुसरी वृद्ध व्यक्ती आहे. केरमनच्या (Kerman) 91 वर्षीय व्यक्तीलाही सोमवारी डिस्चार्ज मिळाल्याची माहिती IRNA ने दिली.  या व्यक्तीला उच्च रक्तदाब आणि अस्थमाही होता. तरीही त्यांनी हार मानली नाही. भारतातही 80 पार वृद्धाने जिंकली लढाई राजस्थानच्या जयपूरमध्येही (jaipur) 85 वर्षीय व्यक्तीने कोरोनाव्हायरवर मात केली आहे. या रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आल्याचं वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं. सवाई मानसिंह रुग्णालयात (SMS hospital) या रुग्णावर उपचार करण्यात आले. आता त्याला घरी आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे.
!function(e,i,n,s){var t="InfogramEmbeds",d=e.getElementsByTagName("script")[0];if(window[t]&&window[t].initialized)window[t].process&&window[t].process();else if(!e.getElementById(n)){var o=e.createElement("script");o.async=1,o.id=n,o.src="https://e.infogram.com/js/dist/embed-loader-min.js",d.parentNode.insertBefore(o,d)}}(document,0,"infogram-async"); जागतिक आरोग्य संघटनेनुसार या व्हायरची लागण झालेल्यांपैकी 3.1 टक्के रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मात्र 80 पेक्षा जास्त वय असलेल्यांमध्ये मृत्यूचं प्रमाण 21.9 टक्के आहे. असं असतानाही इराण आणि भारतातील या वयस्कर व्यक्तीने जिद्द असेल तर काहीही शक्य आहे, हे दाखवून दिलं आहे. व्हायरसची लागण झाल्याने खचलेल्या आणि भीतीखाली असलेल्या इतर सर्वांसाठी या वृद्ध व्यक्ती प्रेरणा ठरल्यात. हे वाचा - कोरोनाव्हायरसचा उद्रेक! 2 आठवड्यांतच लाखो रुग्ण, धक्कादायक आकडेवारी समोर
First published:

Tags: Coronavirus

पुढील बातम्या