नवी दिल्ली 19 मार्च : भारतात (India) कोरोनाव्हायरसच्या (Coronavirus) रुग्णांची संख्या वाढते आहे, खबरदारी म्हणून सरकार काही कठोर पावलं उचलत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. अशा भीतीमध्ये एक दिलासादायक बातमी म्हणजे इतर देशांच्या तुलनेत भारतात कोरोनाव्हायरस पसरण्याचं प्रमाण कमी आहे, असं तज्ज्ञांनी सांगितलं आहे. एक कोरोनाव्हायरस पॉझिटिव्ह व्यक्ती किती जणांना संक्रमित करू शकते, याचा अभ्यास चेन्नईच्या इन्स्टिट्युट ऑफ मॅथमेटिकल सायन्सने (IMS) केला. हे वाचा - याला म्हणतात जिद्द! 103 वर्षांच्या आजीची महाभयंकर ‘कोरोना’वर मात, लाखो रुग्णांसाठी प्रेरणा सौम्या ईश्वरन आणि सीताभ्रा सिन्हा यांनी केलेल्या अभ्यासानुसार, चीनच्या वुहानमध्ये एक कोरोनाव्हायरस पॉझिटिव्ह व्यक्ती सरासरी 2.14 लोकांमध्ये संक्रमण पसरवत होती. तर इराणमध्ये हे प्रमाण सरारी 2.73 आणि इटलीमध्ये 2.34 व्यक्ती आहे. मात्र भारतात एक कोरोनाव्हायरस रुग्ण फक्त 1.7 लोकांना संक्रमित करत आहे. या संशोधनाचे अभ्यासक सीताभ्रा सिन्हा यांनी सांगितलं, जर भारतात जर एका व्यक्तीकडून इतर लोकांमध्ये कोरोनाव्हायरस संक्रमित होण्याची सरासरी अशीच कायम राहिली तर पुढील 5 दिवसांत कोरोनाग्रस्तांची संख्या 200 होईल. जरी ही सरासरी थोडीफार बदलली तरी ही संख्या फक्त 500 पर्यंतच जाईल"!function(e,i,n,s){var t=“InfogramEmbeds”,d=e.getElementsByTagName(“script”)[0];if(window[t]&&window[t].initialized)window[t].process&&window[t].process();else if(!e.getElementById(n)){var o=e.createElement(“script”);o.async=1,o.id=n,o.src=“https://e.infogram.com/js/dist/embed-loader-min.js",d.parentNode.insertBefore(o,d)}}(document,0,"infogram-async"); तज्ज्ञांच्या मते, इराण, इटली आणि वुहानच्या तुलनेत भारतात कोरोनाव्हायरस पसरण्याची गती कमी आहे. इतर देशांच्या तुलनेत भारतात कोरोनाव्हायरसचं पसरण्याचं प्रमाण खूप कमी आहे. अतिशय गंभीर अशी परिस्थिती नाही. चीनच्या वुहानमधून जगभर पसरलेल्या कोरोनाव्हायरसने आतापर्यंत 2 लाखांपेक्षा जास्त लोकांना झाला आहे. 8 हजारपेक्षा जास्त मृत्यू झालेत. हे वाचा - कोरोनाव्हायरसचा उद्रेक! 2 आठवड्यांतच लाखो रुग्ण, धक्कादायक आकडेवारी समोर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.