Home /News /videsh /

चीन, इटलीनंतर 'हा' देश कोरोनाव्हायरसचा पुढचा लक्ष्य, एकाच शहरात दिवसभरात तब्बल 1 हजार रुग्ण

चीन, इटलीनंतर 'हा' देश कोरोनाव्हायरसचा पुढचा लक्ष्य, एकाच शहरात दिवसभरात तब्बल 1 हजार रुग्ण

चीन, इटली, इराण, स्पेननंतर आता अमेरिका (America) कोरोनाव्हायरसचं (Coronavirus) पुढचं लक्ष्य असू शकतं.

    वॉशिंग्टन, 19 मार्च : चीन, इटली, इराण, स्पेननंतर आता अमेरिका (America) कोरोनाव्हायरसचं (Coronavirus) पुढचं लक्ष्य असू शकतं. कारण फक्त न्यूयॉर्कमध्येच (newyork) एकाच दिवसात तब्बल 1000 रुग्ण आढळलेत. दरम्यान काही दिवसात हा आकडा 10,000 पर्यंत जाऊ शकतो, अशी शक्यता न्यूयॉर्कचे मेयर बिल डे ब्लासियो (Bill de Blasio) यांनी वर्तवली आहे. कोरोनाव्हायरसचे सर्वाधिक रुग्ण असलेल्या देशांमध्ये अमेरिका सहाव्या क्रमांकाचा देश आहे. अमेरिकेत आतापर्यंत 9464 प्रकरणं आहेत, तर 155 जणांचा मृत्यू झाला आहे. हे वाचा - इतर देशांच्या तुलनेत भारतात 'कोरोना'चा कमी प्रसार; घाबरू नका, मात्र काळजी घ्या न्यूयॉर्क कोरोनाव्हायरसमुळे सर्वात जास्त प्रभावित आहे. शहरात सर्वात जास्त 2,900 रुग्ण आहेत, तर 21 जणांचा मृत्यू झाला आहे. शहरात एकाच दिवसात 1000 रुग्ण आढळून आलेत. येत्या काही दिवसात हे प्रमाण झपाट्याने वाढेल असं म्हणत, बिल डे ब्लासियो यांनी सावध केलं आहे. न्यूयॉर्क शहरातील कोविड-19 ची प्रकरणं खूप वाढतील आणि 10,000 पेक्षाही जास्त होतील. त्यामुळे कोरोनाव्हायरसला आळा घालण्यासाठी सरकारने तात्काळ पावलं उचलावीत, असं आवाहन त्यांनी केलं आहे. दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनीही आर्थिक मंदी येण्याची शक्यता वर्तवली आहे. !function(e,i,n,s){var t="InfogramEmbeds",d=e.getElementsByTagName("script")[0];if(window[t]&&window[t].initialized)window[t].process&&window[t].process();else if(!e.getElementById(n)){var o=e.createElement("script");o.async=1,o.id=n,o.src="https://e.infogram.com/js/dist/embed-loader-min.js",d.parentNode.insertBefore(o,d)}}(document,0,"infogram-async");
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या