'कोरोनामुळे नाही तर भुकमारीने मरू' पोलिसांच्या सतर्कतेमुळे टळला मोठा प्रसंग

'कोरोनामुळे नाही तर भुकमारीने मरू' पोलिसांच्या सतर्कतेमुळे टळला मोठा प्रसंग

मोठ्या संख्येने हे कामगार पायी प्रवास करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला

  • Share this:

उल्हासनगर, 16 एप्रिल : वांद्रे इथं परप्रांतीयांची गर्दी जमवण्याचे प्रकरण समोर आल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. परंतु, उल्हासनगरमध्येही शेकडो कामगार आपला जीव धोक्यात घालून पायी निघाल्याची घटना समोर आली आहे. परंतु, पोलीस प्रशासनाने या मजुरांची समजूत काढली आणि परत पाठवले.

कोरोनामुळे नाही तर भुकमारीने मरू असे म्हणत 100 पेक्षा अधिक कामगारांनी गावी परतण्यासाठी जीव धोक्यात घालून रात्रीच्या सुमारास गुपचूपपणे पायी प्रवास सुरू केला होता. हे सर्व कामगार उल्हासनगर जवळील माणेरा गावात वास्तव्यास आहे.

हेही वाचा - राज्यात कोरोना रुग्णांची संख्या 3 हजारांच्या जवळ, मृत्यूची संख्या 187वर

दरम्यान, मोठ्या संख्येने हे कामगार पायी प्रवास करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आमच्यावर उपासमारीची वेळ आल्याने हा निर्णय घेतल्याचे कामगारांचे म्हणणे आहे.

माणेरा गावातून  व्हिनस चौक,  शिवाजी मैदान,  उल्हासनगर रेल्वे स्थानक, तिन नंबर ओटी सेक्शन, राधास्वामी संत्सग, पंजाबी कॉलनी, खेमानी परिसर असा प्रवास करीत  हे 100 पेक्षा अधिक कामगार रात्रीच्या अंधारात गावी जाण्यासाठी पायपीट करीत निघाले होते.

मात्र, उल्हासनगर 1 नंबर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धोबी घाटला हे कामगार पोहचताच पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्यांची चौकशी करून त्यांना पुन्हा माघारी पाठवण्यात आले.

हेही वाचा - ‘कोरोना’रुग्णांना घेण्यासाठी गेलेल्या पथकावर हल्ला, 1 डॉक्टर आणि 3 पोलीस जखमी

प्रशासन बाहेरगावच्या तसंच परराज्यातील नागरिकांना आहे, तिथेच राहण्याचे आवाहन करत आहे. शिवाय त्यांना सर्वोत्तपरी मदत करण्याचे आश्वासन पोलीस आणि पालिका प्रशासनाने दिले आहे.

संपादन - सचिन साळवे

First published: April 16, 2020, 9:03 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading