मुंबई, 16 एप्रिल : जगभरात कोरोना व्हायरसनं थैमान घातलं आहे. 180 हून अधिक देशांतील 2,083,237 लोकांवर कोरोनाचे उपचार सुरू आहेतय. तर आतापर्यंत 1 लाख 34 हजार 610 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं नुकत्याच दिलेल्या माहितीनुसार भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या 12 हजारहून अधिक आहे. तर आतापर्यं 414 रुग्णांचा या व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे 1 हजार 344 रुग्ण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. या रुग्णांना कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. तर जगभरात आतापर्यंत 510,329 रुग्ण बरे झाले आहेत.
India's total number of #Coronavirus positive cases rises to 12,380 (including 10,477 active cases, 1489 cured/discharged/migrated and 414 deaths): Ministry of Health and Family Welfare pic.twitter.com/wxRWRTCMp2
— ANI (@ANI) April 16, 2020
हे वाचा-'कोरोनामुळे नाही तर भुकमारीने मरू' पोलिसांच्या सतर्कतेमुळे टळला मोठा प्रसंग
सर्वात जास्त रुग्ण मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रात आहेत. राज्यातल्या कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. राज्यात बुधवारी 232 रुग्णांची भर पडली तर 9 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे रुग्णांची एकूण संख्या 2916 झाली असून 187 जणांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत 52000 तपासणी झाल्या असून त्यातील 48 हजार 198 तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सगळ्यात जास्त रुग्ण हे मुंबई आणि ठाण्यात आहेत. राज्यात 5 हजार 394 सर्व्हेक्षण पथकं काम करत असून त्यांनी आत्तापर्यंत 20 लाख लोकांचा सर्व्हे केल्याची माहितीही देण्यात आली आहे.
हे वाचा-वाण सामान देणारा दुकानदार कोरोना पॉझिटिव्ह, संपर्कात आलेल्या लोकांचा शोध सुरू
संपादन, संकलन- क्रांती कानेटकर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Coronavirus symptoms