जाहिरात
मराठी बातम्या / विदेश / कोरोनाव्हायरसवर औषध सापडलं, ‘या’ कंपनीने केला दावा; विषाणूवर उपचार शक्य होणार

कोरोनाव्हायरसवर औषध सापडलं, ‘या’ कंपनीने केला दावा; विषाणूवर उपचार शक्य होणार

दिल्लीमध्ये कोरोना बाधित रुग्णाची केस पहिल्यांदा 2 मार्चला समोर आली होती. कोरोना बाधित रुग्ण हा इटलीतून आला होता.

दिल्लीमध्ये कोरोना बाधित रुग्णाची केस पहिल्यांदा 2 मार्चला समोर आली होती. कोरोना बाधित रुग्ण हा इटलीतून आला होता.

आम्ही असा घटक (Compund) तयार केला आहे, ज्यामुळे कोरोनाव्हायरसचा उपचार शक्य आहे, असा दावा अमेरिकेतील औषध कंपनी फाइजर ने (Pfizer)  केला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

न्यूयॉर्क, 03 मार्च : एकिकडे कोरोनाव्हायरसचा (Cornovirus) जगभरात पसरत आहे, तर दुसरीकडे त्याच्यावर उपचारासाठी सर्व शास्त्रज्ञ दिवसरात्र मेहनत करत आहेत. कोरोनाव्हायरसवरला मारक अशा औषधांचा शोध सुरू आहे. त्यात अमेरिकेतल्या (America) शास्त्रज्ञांना आशेचा किरण सापडला आहे. . आम्ही असा घटक (Compund) तयार केला आहे, ज्यामुळे कोरोनाव्हायरसचा उपचार शक्य आहे, असा दावा अमेरिकेतील फाइजर (Pfizer) या औषध कंपनी केला आहे. कंपनीने सांगितलं की, ‘या कंपाऊंडमध्ये कोरोनाव्हायरसला रोखण्याची क्षमता आहे. या कंपाऊंडची सध्या स्क्रिनिंग सुरू आहे, जी मार्चपर्यंत पूर्ण होईल. जर ही स्क्रिनिंग सुरू झाली तर यावर प्रयोग सुरू होईल आणि औषधाची चाचणी होईल’ हे वाचा - मोबाईलमध्येही घुसला कोरोना; ‘या’ मेसेजवर क्लिक कराल तर व्हाल व्हायरसचे शिकार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (donald trump) यांनी उपराष्ट्रपती माइक पेन्स  आणि औषध कंपन्यांच्या अधिकाऱ्यांसोबत सोमवारी व्हाइट हाऊसमध्ये चर्चा केली. त्यावेळी फाइजर कंपनीचे चीफ साइंटिफिक ऑफिसर माइकल डोलस्टनही उपस्थित होते. उपराष्ट्रपती माइक पेन्स यांनी सोमवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं की, “कोरोनाव्हायरविरोधातील लस या वर्षाच्या अखेरपर्यंत किंवा पुढच्या वर्षाच्या सुरुवातीपर्यंत तरी कदाचित उपलब्ध होऊ शकणार नाही. मात्र कोरोनाव्हायरसग्रस्त रुग्णांवर उपचारासाठी मार्चपर्यंत औषध उपलब्ध होईल” अमेरिकी चॅनेल CNN च्या रिपोर्टनुसार, ‘या व्हायरसमुळे 6 जणांचा मृत्यू झाला आहे. 43 स्थानिक आणि 48 परदेशातून परतलेल्या लोकांना या व्हायरसची लागण झाली आहे’ तर सेंटर फॉर डिसीस कंट्रोल डायरेक्टर रॉबर्ट रेडफील्ड यांच्या मते, ‘अमेरिकेत आतापर्यंत कोरोनाव्हायरसची 46 प्रकरणं आहेत’ हे वाचा -  नको रे बाबा Corona होईल ! भीतीपोटी हाताऐवजी पायाचा वापर, व्हिडीओ व्हायरल

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात