मराठी बातम्या /बातम्या /देश /मोबाईलमध्येही घुसला ‘कोरोना'; तुम्हालाही आलाय का असा मेसेज, क्लिक कराल तर व्हाल व्हायरसचे शिकार

मोबाईलमध्येही घुसला ‘कोरोना'; तुम्हालाही आलाय का असा मेसेज, क्लिक कराल तर व्हाल व्हायरसचे शिकार

भले तुम्हाला कोरोनाव्हायरस (Coronavirus)  झाला नसेल, मात्र तरीही तुम्ही कोरोनाव्हायरसचे शिकार होऊ शकता.

भले तुम्हाला कोरोनाव्हायरस (Coronavirus) झाला नसेल, मात्र तरीही तुम्ही कोरोनाव्हायरसचे शिकार होऊ शकता.

भले तुम्हाला कोरोनाव्हायरस (Coronavirus) झाला नसेल, मात्र तरीही तुम्ही कोरोनाव्हायरसचे शिकार होऊ शकता.

मुंबई, 03 मार्च : संपूर्ण जगात कोरोनाव्हायरसने (Coronavirus) आपली दहशत पसरवली आहे. भारतातही (India) आता कोरोनाव्हायरसचे आणखी 3 रुग्ण आढळून आलेत. हाच कोरोना आता हॅकर्सचं शस्त्र झाला आहे. भले तुम्ही कोरोनाव्हायरसचे शिकार नाहीत, मात्र तुम्ही सायबर फ्रॉडचे (cyber fraud) शिकार जरूर होऊ शकता. मिळालेल्या माहितीनुसार हॅकर्सनी (hacker) सर्वात आधी जपान आणि त्यानंतर अमेरिका, ब्रिटनला आपलं शिकार बनवलं. आता मुंबईसहित पूर्ण भारतावर त्यांची नजर आहे.

कोरोनाव्हायरसची भीती सर्वांच्या मनात आहे. त्यामुळे कोरोनाव्हायरस म्हणजे काय, कोरोनाव्हायरसची लक्षणं, त्यापासून वाचण्याचा उपाय असं इंटरनेटवर तुम्ही सर्च करत आहात. तुमच्या याच भीतीचा फायदा हॅकर्सनी घेतला आहे. त्यामुळे हॅकर्स कोरोनाव्हायरसंबंधित माहिती, अलर्ट, दक्षतेबाबत मेल किंवा व्हॉट्सअप मेसेज पाठवत आहेत. तुम्हालाही असे मेसेज आले असतील आणि तुम्ही त्यावर क्लिक केला तर एका क्लिकवर तुम्ही हॅकर्सचे शिकार होऊ शकता.

हे वाचा - दिल्ली, तेलंगणानंतर जयपूरमध्येही कोरोना; पुण्याहून येणाऱ्या रिपोर्टची प्रतीक्षा

हॅकर्स कोरोनासंबंधित माहिती मेल किंवा मेसेज करतात आणि त्यासोबतच एक लिंकही टाकतात. या लिंकवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्ही दुसऱ्या वेब पेजवर जाता आणि तुमचा डेटा चोरी होतो.  हे हॅकर्स इतक्यावरच थांबलेले नाहीत तर, या खोट्या ईमेलसोबत World Health Organisation (WHO) या संस्थेचं पेज सुद्धा लिंक करण्यात आलेलं असतं. त्यामुळे या ईमेलची विश्वासार्हता वाढते आणि कुणीही या जाळ्यात अडकू शकतं.अशी प्रकरणं वाढत आहे, त्यामुळे सायबर सेलने लोकांना अलर्ट केलं आहे.

हे वाचा - Alert! भारतात पुन्हा आला महाभयंकर 'कोरोना', 2 रुग्णांना व्हायरसची लागण

तुम्हालाही जर असा कोणताही ईमेल आला तर त्याच्या आहारी जाऊ नका. नाहीतर तुम्हीही कोरोनाव्हायरसचे प्रत्यक्ष नाही मात्र असे अप्रत्यक्ष शिकार व्हाल. त्यामुळे सावध राहा.

First published:
top videos

    Tags: Coronavirus, Mobile