Home /News /videsh /

नको रे बाबा Corona होईल ! भीतीपोटी लोकं करत आहेत हाताऐवजी पायाचा वापर, व्हिडीओ व्हायरल

नको रे बाबा Corona होईल ! भीतीपोटी लोकं करत आहेत हाताऐवजी पायाचा वापर, व्हिडीओ व्हायरल

Screengrab - Twitter / @Zachary31411891

Screengrab - Twitter / @Zachary31411891

आपल्याला कोरोनाव्हायरस (Coronavirus) होऊ नये, यासाठी प्रत्येक जण काळजी घेत आहे. लोकं आता एकमेकांना भेटल्यानंतर अभिवादनही (Greeting) वेगळ्या पद्धतीनं करत आहेत. हँडशेकऐवजी (Hand shake) लेगशेक (Leg Shake) करताना दिसत आहेत.

    बीजिंग, 02 मार्च : कोरोनाव्हायरसमुळे (Coronavirus) जगभरात आतापर्यंत 3000 पेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. चीनव्यतिरिक्त इतर देशांमध्येही या व्हायरसने थैमान घातलं आहे. आपल्याला व्हायरस होऊ नये, यासाठी प्रत्येक जण काळजी घेत आहे. यासाठी अनेकांनी व्हायरसपासून संरक्षण मिळावं यासाठी काय काय नाही केलं, तुम्ही पाहिलंच आहे. आता अशाच आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. जिथं लोकं एकमेकांना भेटल्यानंतर हात (Hand) नव्हे तर पाय (Leg) मिळवत आहे. कोरोनाच्या भीतीनं लोकांनी हात मागे घेतलेत आणि पाय पुढे केलेत. Hand shake ऐवजी Leg Shake केलं जातं आहे. हात मिळवून आपल्याला व्हायरसची लागण होऊ नये, यासाठी पाय मिळवून अभिवादन केलं जातं आहे. या व्हिडीओत एक मास्क घातलेली व्यक्ती आपल्या गाडीतून उतरते. त्यावेळी त्याचा एक मित्र त्याच्या जवळ येतो आणि हँडशेक करायला जातो. मात्र दोघंही थांबतात आणि हात मिळवण्याऐवजी पाय मिळवतात, म्हणजेच लेग शेक करतात. संबंधित - कोरोनाची दहशत, चिमुरडीचा निरागसपणा; मास्क घालून बिस्कीट खाताना तिचा Video पाहा असाच आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. फक्त सामान्य व्यक्तीच नव्हे तर नायजेरियातील Lagos State चे गव्हर्नर Sanwo-Olu अशाचप्रकारे हँडशेकऐवजी लेगशेक करताना दिसले. कोरोना व्हायरसमुळे जगभरात 85,000 हून अधिक लोक संसर्गित झाले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organization) या संसर्गजन्य रोगाचं नाव कोविड -19 (Covid-19) ठेवलं आहे. संबंधित - Coronavirus चा चीनला असा झाला फायदा, फोटो पाहाल तर विश्वासही नाही बसणार
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: China, Coronavirus

    पुढील बातम्या