रोम, 7 मार्च : चीननंतर (China) कोरोनाव्हायरसने (Coronavirus) सर्वात जास्त बळी घेतलेत ते इटलीमध्ये (Italy). 24 तासांत तब्बल 49 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. म्हणजेच कोरोनाव्हायरसने एका तासाला 2 जणांचा बळी घेतला आहे. त्यामुळे शुक्रवारी इटलीत कोरोनाव्हायरसमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 197 वर पोहोचली आहे.
इटलीमध्ये कोरोनाव्हायरसची एकूण 4,636 प्रकरणं आहेत. चीन, दक्षिण कोरिया, इराणनंतर, इटलीमध्ये कोरोनाव्हायरसचे सर्वाधिक रुग्ण आहेत.
The #coronavirus cases in Italy:
Day1: 14cases/1dead D2: 76/2 D3: 153/3 D4: 231/7 D5: 374/12 D6: 528/17 D7: 821/21 D8: 1128/29 D9: 1577/34 D10: 1835/52 D11: 2263/79 D12: 2706/107 D13: 3296/148 D14: 3916/197 523 recovered 25% home quarantine no symptoms 35k tests 30.7k negative — Tancredi Palmeri (@tancredipalmeri) March 6, 2020
कोरोनाव्हायरस सर्वात जास्त वयोवृद्ध व्यक्तींनाच आपल्या विळख्यात घेत आहे. जपाननंतर इटलीत सर्वाधिक वयस्कर लोकं आहेत. वयस्कर व्यक्तींनी घरातच राहावं असं आवाहन करण्यात आलं आहे. तरीदेखील इटलीतील वयोवृद्ध लोकं याकडे दुर्लक्ष करत आहेत. कोरोनाव्हायरसच्या भीतीनं बुधवारपासून इटलीतील शाळा 2 आठवडे बंद ठेवण्यात आल्यात. त्यामुळे विद्यार्थी घरातच राहत आहेत. परिणामी वयस्कर व्यक्ती आपल्या नातवंडांसोबत घराबाहेर वेळ घालवताना दिसत आहेत. खेळाच्या मैदानांवर वयोवृद्ध व्यक्ती आपल्या नातवंडांसोबत वेळ घालवत असल्याचं दिसतं आहे.
संबंधित - आता 'कोरोना'च माणसांना घाबरणार; हे कवच घातल्यावर व्हायरस जवळही येणार नाही
जगभरातील कोरोनाव्हायरस रुग्णांची एकूण संख्या 98 हजारपेक्षा जास्त झाली आहे. शनिवारी चीनमध्येच कोरोनाव्हायरसची 80,552 प्रकरणं आहेत, 3,070 लोकांचा मृत्यू झाला आहे. चीनच्या बाहेर एकूण 17,571 प्रकरणं समोर आलीत, 343 लोकांचा मृत्यू झाला आहे.
चीननंतर कोरोनामुळे सर्वाधिक प्रभावित असलेल्या देशांमध्ये दक्षिण कोरिया (6,767 प्रकरणं, 44 मृत्यू), इटली (3,858 प्रकरणं, 148 मृत्यू), इराण (3,513 प्रकरणं, 107 मृत्यू) आणि फ्रान्समध्ये (423 प्रकरणं, 7 मृत्यू) यांचा समावेश आहे.
संबंधित - तुम्हाला कोरोनाव्हायरसची लक्षणं दिसली तर... काय करायचं, कुठे जायचं जाणून घ्या
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.