इस्लामाबाद, 30 मार्च : कोरोनाने तब्बल 180 देशांमध्ये शिरकाव केला आहे. पाकिस्तानमध्येही कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. इमरान खान यांनी नवं पाकिस्तान बनवण्याचे आश्वासन केले होते, मात्र सध्या हाच देश कोरोनाच्या संकटात आहे. याच देशात सध्या इमरान खान सरकार लोकांना फुकटात रेशन देत आहेत. मात्र येथील हिंदूना रेशन मिळेनासे झाले आहे. ही घटना सिंध प्रांतातील कराची शहरातील आहे. सिंध प्रांतात कोरोनाची भीती दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर येथील मुस्लिमांना रेशन व आवश्यक वस्तू दिल्या जात आहेत पण हिंदूंना मात्र देण्यास नकार दिला जात आहे. हिंदूंना सांगण्यात आले आहे की, हे रेशन फक्त मुस्लिमांसाठी आहे. यामुळे येथील हिंदूंमध्ये संतापाचे वातावरण आहे. पाकमधील लॉकडाऊन लक्षात घेता दररोज कामगार आणि कामगारांना स्थानिक स्वयंसेवी संस्था आणि प्रशासनाच्या वतीने रेशन देण्याचे आदेश सिंध सरकारने दिले आहेत. मानवाधिकार कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार प्रशासनाने हिंदूंना तुम्ही रेशन मिळण्यास पात्र नाही, असे सांगण्यात आले. वाचा- पिंपरी-चिंचवडमध्ये जमावबंदीचं उल्लंघन, टेरेसवर सामूहिक नमाज पठण करणाऱ्या 13 जणांना बेड्या प्रशासन हिंदूंना सांगत आहे की हे रेशन फक्त मुस्लिमांसाठी आले आहे. एवढेच नव्हे तर एकाचवेळा तब्बल 3 हजार लोकं रेशन घेण्यासाठी जमतातले, यासाठी कोणतेही व्यवस्था केलेली नाही. एवढेच नाही तर लियारी, सचल घोथ, कराचीच्या इतर भागांसह संपूर्ण सिंधमध्ये हिंदूंना रेशन नाकारले जात आहे. अल्पसंख्यांक समुदाय हा भयंकर खाद्य पेचप्रसंगावरुन जात आहे असा इशारा राजकीय कार्यकर्ते डॉ. अमजद अयूब मिर्झा यांनी दिला आहे. वाचा- ‘कोरोनामुळे 1 लाख लोकं मेली तरी ही आपली चांगली कामगिरी’, ट्रम्प यांच्या वक्तव्याने खळबळ 1500हून अधिक लोकांना कोरोनाची लागण पाकिस्तानमध्ये कोरोना संसर्ग झालेल्या लोकांची संख्या 1500च्या पुढे गेली आहे. पाकिस्तानमध्ये कोरोना विषाणूचा कहर कायम आहे. आतापर्यंत 14 लोकांचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक प्रभावित प्रांतांमध्ये पंजाब 593 आणि सिंध 502 घटनांचा समावेश आहे. या आपत्तीच्या वेळीही पाकिस्तानी प्रशासन हिंदूंशी भेदभाव करण्यापासून थांबत नाही आहे. दुसरीकडे इमरान खान सरकारने कोट्यवधी रुपयांचे मदत पॅकेज जाहीर केले. यापूर्वी सत्तेत येताना इम्रान यांनी अल्पसंख्यांकांशी कोणताही भेदभाव न करता पाकिस्तानला एक रियासत बनवल्याचे, आश्वासन लोकांना दिले होते. मात्र आता पाकिस्तानमधील हिंदूंना या संकटाच्या घटनेत रेशन दिले जात नाही. वाचा- लॉकडाऊननंतर होऊ शकतो ‘कोरोना’चा उद्रेक, तज्ज्ञांनी व्यक्त केली भीती; सांगितला बचावाचा मार्ग
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.