जाहिरात
मराठी बातम्या / पुणे / पिंपरी-चिंचवडमध्ये जमावबंदीचं उल्लंघन, टेरेसवर सामूहिक नमाज पठण करणाऱ्या 13 जणांना बेड्या

पिंपरी-चिंचवडमध्ये जमावबंदीचं उल्लंघन, टेरेसवर सामूहिक नमाज पठण करणाऱ्या 13 जणांना बेड्या

पिंपरी-चिंचवडमध्ये जमावबंदीचं उल्लंघन, टेरेसवर सामूहिक नमाज पठण करणाऱ्या 13 जणांना बेड्या

लॉकडाऊनदरम्यान आणि जमावबंदीच्या काळात नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला होता.

  • -MIN READ
  • Last Updated :

पिंपरी-चिंचवड, 30 मार्च : कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. त्यानंतर जमावबंदीचं कलम लागू झालं. दोन किंवा चार पेक्षा अधिक लोकांना एकत्र जमण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आणि गर्दी टाळली जावी म्हणून देशभरात सर्व धर्मियांची प्रार्थनास्थळं बंद ठेवण्यात आली आहेत. मात्र सरकार आणि पोलिसांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत पिंपरी-चिंचवड शहरात मुस्लीम बांधवांनी एकत्र येऊन रहिवासी इमारतीच्या गच्चीवर सामूहिक नमाज पठण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी आतापर्यंत 13 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. लॉकडाऊनदरम्यान आणि जमावबंदीच्या काळात नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला होता. हे वाचा- नाशिकमध्ये आढळला कोरोनाचा पहिला रुग्ण, कोणताही केला नव्हता परदेश दौरा! पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत 333 गुन्हे नियमांचं उल्लंघन केल्या प्रकऱणी दाखल करण्यात आले आहेत. देशभरात अनेक शहरांमध्ये वारंवार आवाहन करूनही अनेक नागरिक लॉकडाऊन आणि जमावबंदीचे आदेश गांभीर्यानं पाळत नसल्याचं समोर आलं आहे. अत्यावश्यक कामाशिवाय अनेक नागरिक लॉकडाऊनच्या काळात एकत्र येत असल्याचं किंवा बाहेर फिरत असल्याचं दिसत आहे. नियमांना केराची टोपली दाखवणाऱ्यांवर कारवाई होईल असा इशारा पिंपरी-चिंचवड पोलिसांनी दिला आहे. देशभरात आतापर्यंत कोरोनाच्या 1 हजार 24 केसेस समोर आल्या आहेत तर त्यापैकी 96 जणांनी यशस्वी कोरोनाशी दोन हात केले आहेत. महाराष्ट्रात 34 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सध्या 155 जणांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत महाराष्ट्रात कोरोनामुळे 8 तर देशात 27 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचं संक्रमण रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन पाळण्याचे आदेश दिले आहेत. हे वाचा- ‘10 लाख लोकं मेली तरी ही आपली चांगली कामगिरी’, ट्रम्प यांच्या वक्तव्याने खळबळ

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात