पॅरिस, 30 मार्च : जगभरात कोरोनाची भीती दिवसेंदिवस वाढत आहे. जगभरातली तब्बल 180 देशांमध्ये सध्या लॉक डाऊन करण्यात आले आहे. फ्रान्समध्येही कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. फ्रान्समध्ये 40 हजार 174 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, 2606 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळं फ्रान्समधील परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी सध्या प्रशासन विविध उपाययोजना करत आहे. यासाठी आता त्यांनी आपल्या सर्व हायस्पीड ट्रेनचे रुपांतर अॅम्बुलन्समध्ये केले आहे.
फ्रान्सने देशातील कोरोना रूग्णांच्या वाहतुकीसाठी आपल्या वेगवान टीजीव्ही गाड्यांपैकी एकाचे रुग्णवाहिकेत रूपांतर कोरोनाचा रुग्ण देशात कुठेही असल्यास ही ट्रेन त्याला 5 तासांत राजधानी पॅरिसला घेऊन जाईल. रेल्वेच्या प्रत्येक केबिनमध्ये 4 रुग्णांना आणता येतील. यामध्ये ऑक्सिजन, व्हेंटिलेटर आणि वैद्यकीय कर्मचारी यासारख्या आपत्कालीन सुविधाही आहेत. काही दिवसांपूर्वी फ्रान्समधील 20 कोरोना रूग्णांना या ट्रेनच्या मदतीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही ट्रेन प्रति तास 300 किमीचा प्रवास करते.
वाचा-कोरोनाचं थैमान, 12 तासांत 12 नवे रुग्ण, महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 215
ट्रेनमधील रूग्णांची काळजी घेणारे डॉक्टर लिओनेल लम्हूट यांनी, बहुतेक कोरोनाचे रुग्ण फ्रान्सच्या पूर्वेकडील आणि पश्चिमेकडे येत आहेत. ट्रेनच्या प्रत्येक केबिनमध्ये ऑक्सिजन, व्हेंटिलेटर आणि इतर सर्व आवश्यक उपकरणांमुळे हेलिकॉप्टरपेक्षा जास्त सोयीचे आहे, असे सांगितले.
वाचा-पाकचे नापाक काम, कोरोनाच्या आपत्तीत हिंदूना नाकारले रेशनजगात हाहाकार
जगभरात कोरोना व्हायरसमुळे तब्बल 33 हजार 976 लोकांचा मृत्यू झाला आहे. सर्वात जास्त इटली 10 हजारहून अधिकांचा मृत्यू झाला आहे. आता इटलीनंतर अमेरिकेतही कोरोनाचा धोका वाढल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात कोरोनाचा सर्वात जास्त धोका आहे. मागच्या तीन दिवसांमध्ये नव्या रुग्णांच्या संख्येत तीनपटीनं वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. 19 राज्यांमध्ये सरासरी 1 हजार रुग्ण आढळले असल्याची माहिती मिळते.
वाचा-'कोरोनामुळे 1 लाख लोकं मेली तरी ही आपली चांगली कामगिरी', ट्रम्प यांच्या वक्तव्याने खळबळ
Published by:Priyanka Gawde
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.