Home /News /mumbai /

कोरोनाचं थैमान, 12 तासांत 12 नवे रुग्ण, महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 215 वर

कोरोनाचं थैमान, 12 तासांत 12 नवे रुग्ण, महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 215 वर

  मुंबई, 30 मार्च : राज्यात कोरोनानं धुमाकूळ घातला आहे. देशातील सर्वात जास्त कोरोनाग्रस्तांची संख्या महाराष्ट्रात आहे. राज्य आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या 215वर पोहोचली आहे. रविवारी सकाळी 12 नवीन रुग्णाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे आहेत. पुण्यात 5, मुंबई 3, नागपूर 2, नाशिक आणि कोल्हापुरात प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. शनिवारपर्यंत 203 रुग्ण कोरोनाबाधित असल्याची माहिती समोर आली होती. मुंबईत आणखी 05 रुग्णांचा समावेश झाल्यामुळे आता मुंबईतील एकूण रुग्णांची संख्या 114 वर पोहोचली आहे. दरम्यात महाराष्ट्रातील हा वाढता आकडा चिंता व्यक्त करणारा आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी 14 एप्रिलपर्यंत महाराष्ट्रासह देशभरात लॉकडाऊन करण्यात आला आहे. या वाढत्या आकड्यांमुळे महाराष्ट्रातील लॉकडाऊन वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात 8 जणांचा मृत्यू झाला आहे. बुलडाण्यात तर एक मुंबईतील केईएम रुग्णालयात असे शनिवारी दोन कोरोनामुळे मृत्यू झाले होते. भारतात सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्र आणि त्यानंतर जवळपास केरळसह इतर राज्यांमध्ये आढळले आहेत. त्यातही मुंबई आणि पुण्यात रुग्णांची संख्या अधिक आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोनामुळे 8 जणांचा मृत्यू झाला आहे तर शनिवारपर्यंत 203 कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा आहे. मुंबईतील 14, पुण्यातील 15, नागपूर आणि औरंगाबादमधून एक तर यवतमाळमधून तीन असे एकूण 34 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

  तुमच्या शहरातून (मुंबई)

  Published by:Manoj Khandekar
  First published:

  Tags: Corona

  पुढील बातम्या