जाहिरात
मराठी बातम्या / देश / कोरोनाच्या संकटात चिमुरड्यांसाठी धावून आला देवदूत, तब्बल 200 मुलांचा वाचवला जीव

कोरोनाच्या संकटात चिमुरड्यांसाठी धावून आला देवदूत, तब्बल 200 मुलांचा वाचवला जीव

कोरोनाच्या संकटात चिमुरड्यांसाठी धावून आला देवदूत, तब्बल 200 मुलांचा वाचवला जीव

निर्मल संतवानी लॉकडाऊन लागू झाल्यापासून आतापर्यंत थॅलेसेमियाग्रस्त मुलांना रक्त उपलब्ध करून देण्यासाठी झटत आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

शरद श्रीवास्तव/ भोपाळ, 15 मे : कोरोनाव्हायरसला (coronavirus) रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे (lockdown) लोकांना कित्येक समस्यांना सामोरं जावं लागतं आहे. मात्र याचा सर्वात जास्त फटका बसतो आहे, तो इतर आजार असलेल्या रुग्णांना. कारण त्यांना वेळेत उपचार मिळत नाही आहे. त्यातही सर्वात गंभीर परिस्थितीही आहे, ती थॅलेसेमियाग्रस्त (thalassemia) मुलांची. रक्तदानावरच (blood donation) या मुलांचं आयुष्य अवलंबून असतं आणि लॉकडाऊनमुळे रक्तदानही कमी प्रमाणात होतं आहे. मात्र अशा कठिण परिस्थितीतही या मुलांसाठी एक देवदूत धावून आला आणि त्यानं एक-दोन नव्हे तर तब्बल  200 लहान मुलांचा जीव वाचवला आहे. मध्य प्रदेशच्या (madhya pradesh) ग्वालियरमध्ये राहणारे निर्मल संतवानी. लॉकडाऊन लागू झाल्यापासून आतापर्यंत थॅलेसेमियाग्रस्त मुलांना रक्त उपलब्ध करून देण्यासाठी झटत आहेत. निर्मल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लॉकडाऊनमध्ये आतापर्यंत 6 कॅम्प लावून 173 युनिट ब्लड डोनेट केलं आहे. यामुळे ग्वालियरच्या चंबल भागातील 200 पेक्षा जास्त थॅलेसेमियाग्रस्त मुलांना वेळेत रक्त मिळालं आणि त्यांचा जीव वाचला. हे वाचा -  35 दिवसांच्या चिमुरड्याची कोरोनावर मात, रेडझोनमध्ये एका दिवसात 51 रुग्णांना डिस्चार्ज निर्मल संतवानी यांचा मुलगा करणलाही थॅलेसेमिया आहे. त्यामुळे या मुलांना रक्ताची गरज किती असते, हे त्यांना चांगलंच माहिती आहे. त्यामुळे काहीही झालं तरी लॉकडाऊनमध्ये थॅलेसेमिया पीडित मुलांची मदत आपण करणार, असा ठाम निश्चय त्यांनी केला. त्यांनी लोकांशी संपर्क साधायला सुरुवात केली आणि त्यांना रक्तदान करण्यासाठी प्रोत्साहित केलं. निर्मल यांना लोकांनीही साथ दिली. त्यामुळे लॉकडाऊनसारख्या कठिण परिस्थितीतही चंबल भागातील जवळपास 200 थॅलेसेमिया पीडित मुलांना वेळेत रक्त मिळालं. हे वाचा -  VIDEO : श्रावणबाळ! 11 वर्षांच्या मुलानं लॉकडाऊनमध्ये आई-बाबांना सायकलवरून नेलं थॅलेसेमिया हा आजार लहान मुलांमध्ये जन्मापासून असतो. या आजारानं ग्रस्त असलेल्या मुलांना प्रत्येकी 15 दिवसांनी रक्ताची गरज भासते. जोपर्यंत त्यांचं बोनमॅरो ट्रान्सप्लांट होत नाही, तोपर्यंत त्यांना रक्ताची गरज भासते. काही जणांचं बोनमॅरो ट्रान्सप्लांट वेळेत होतं, तर काही जणांना प्रतीक्षा करावी लागते. तोपर्यंत मात्र त्यांना रक्तदानच जगवतं, त्यामुळे निर्मलसारख्या व्यक्ती त्यांच्यासाठी एक देवदूतच आहे. संपादन - प्रिया लाड

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात