मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

कोरोनाविरोधात हर्ड इम्युनिटी ठरू शकते जीवघेणी, WHO ने केलं सावध

कोरोनाविरोधात हर्ड इम्युनिटी ठरू शकते जीवघेणी, WHO ने केलं सावध

कोरोनाव्हायरशी लढण्यासाठी हर्ड इम्युनिटीचा (Herd Immunity) विचार अनेक देशातील तज्ज्ञ करत आहेत.

कोरोनाव्हायरशी लढण्यासाठी हर्ड इम्युनिटीचा (Herd Immunity) विचार अनेक देशातील तज्ज्ञ करत आहेत.

कोरोनाव्हायरशी लढण्यासाठी हर्ड इम्युनिटीचा (Herd Immunity) विचार अनेक देशातील तज्ज्ञ करत आहेत.

    नवी दिल्ली, 14 मे : सध्या लॉकडाऊनशिवाय या व्हायरसला रोखण्यासाठी विशेष तयारी नाही. त्यामुळे हर्ड इम्युनिटी निर्माण होईल आणि व्हायरसचा नाश होईल. अशी आशा तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. भारतासह अनेक देशांमधील शास्त्रज्ञ कोरोनाव्हायरसचा नाश करण्यासाठी हर्ड इम्युनिटीबाबत (Herd Immunity) बोलत आहेत. मात्र जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) हा मार्ग जीवघेणा ठरू शकतो, असं म्हटलं आहे. हर्ड इम्युनिटी म्हणजे सामूहिक प्रतिरोधक क्षमता निर्माण करणं. जागतिक आरोग्य संघटनेच्या आपत्कालीन विभागाचे संचालक माइक रेयान म्हणाले, "हर्ड इम्युनिटी हा शब्द प्राण्यांच्या आरोग्याशी संबंधित आहे. प्राण्यांच्या झुंडीत इम्युनिटी विकसित करण्यासाठी काही प्राण्यांचा जीव धोक्यात घातला जातो. मात्र माणसं जनावर नाहीत. त्यांच्या जीवाची जबाबदारी कोण घेईल? हर्ड इम्युनिटी लोकांच्या जीवसोबत खेळ होऊ शकतो" हे वाचा - कोरोनाव्हायरसमुळे कसा होतो रुग्णांचा मृत्यू? शास्त्रज्ञांना सापडलं मोठं कारण जागतिक आरोग्य संघटनेच्या टेक्निकल लीड मारिया वॅन यांनी सांगितलं की, "सध्या कोरोनाव्हायरसविरोधातील अँटिबॉडीजबाबतची परिस्थिती पाहता किती स्तरावर इन्युनिटी गरजेची आहे हे स्पष्ट नाही. त्यामुळे सध्या क्वारंटाइन आणि टेस्टींगच व्हायरसशी लढण्याचे उत्तम मार्ग आहेत" हर्ड इम्युनिटीसाठी मोजावी लागेल किंमत हर्ड इम्युनिटी विकसित करण्यासाठी दोन मार्ग आहेत. एक म्हणजे भरपूर लोकांना लस दिली जावी किंवा त्यांना संक्रमित केलं जावं. तज्ज्ञांच्या मते, लोकांना संक्रमित होण्याचा विचार केला तर तब्बल 70 टक्के लोकांना संक्रमित व्हावं लागेल तेव्हाच हर्ड इम्युनिटी शक्य आहे. असं केलं तर फिजिकल डिस्टन्सिंग सोडावं लागेल आणि त्यानंतर काही महिन्यातच मोठ्या संख्येनं लोकं संक्रमित होतील आणि त्याचा भार आरोग्यव्यवस्थेवर पडेल, मृतांचा आकडा झपाट्याने वाढेल. हे वाचा - राज्यात Lockdown 4.0 अटळ; आरोग्यमंत्र्यांनी दिला रुग्णवाढीचा इशारा! हे आहे कारण या व्हायरसविरोधात आतापर्यंत लस नाही, त्यामुळे भरपूर लोकांना याची लागण होईल आणि नवीन समस्या, नवीन आव्हानं उभी राहतील. काय आहे योग्य मार्ग सध्या तरी सोशल डिस्टन्सिंग आणि लॉकडाऊनचं सक्तीनं पालन कमीत कमी एक वर्ष केलं जावं. मात्र देश आणि सामान्य लोकांना हे जास्त कालावधीसाठी शक्य नाही. त्यामुळे याचा मधला मार्ग तज्ज्ञांनी सुचवला आहे. जेव्हा संक्रमणात घट होईल तेव्हा कठोर नियमांमध्ये शिथीलता द्यावी आणि जेव्हा संक्रमण वाढतील तेव्हा पुन्हा कठोर नियम लागू करावेत. जोपर्यंत कोरोनाव्हायरसवर प्रभावी लस येत नाही, तोपर्यंत हाच मार्ग आहे. संकलन, संपादन - प्रिया लाड
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Coronavirus, Who

    पुढील बातम्या