अमेरिकेचा सर्वात मोठा खुलासा, चीन आणि WHOचा असा होता कोरोना संदर्भातला प्लॅन

अमेरिकेचा सर्वात मोठा खुलासा, चीन आणि WHOचा असा होता कोरोना संदर्भातला प्लॅन

WHOने तब्बल 6 आठवडे उशिरा जगातील इतर देशांना कोरोना संबंधित माहिती दिली. यावरून आता अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेने पुरावे सादर केले आहेत.

  • Share this:

वॉशिंग्टन, 13 मे : अमेरिकेची (US) गुप्तचर संस्था CIAकडे ठाम पुरावे आहेत की जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) चीनच्या धमक्यांना घाबरून कोरोनाच्या प्रसाराशी माहिती लपवली. CIAच्या म्हणण्यानुसार, चीनने WHOला धमकी दिली होती की जर घाईघाईने इशारा दिला तर ते त्यास कोरोना संक्रमणाच्या तपासणीत सामिल होणार नाहीत. दरम्यान चीनचा हेतू का तपासणी नाही तर कोरोना संक्रमणाचा प्रसार रोखण्यासाठी PPE, मास्क आणि इतर वैद्यकीय सामान जमा करण्याचा होता.

डेली मेलमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार WHOने अलर्ट जारी करेपर्यंत चीननं जगभरातील देशांकडून कोरोनाच्या नावाखाली PPE, मास्क, ग्लोव्ह्ज व इतर जीवनावश्यक वस्तू गोळा केल्या. न्यूयॉर्क टाईम्सच्या एका रिपोर्टमध्ये असे निष्पण्ण झाले आहे की, कोरोनाचा संसर्ग गेल्यानंतरही चीनकडे 2 कोटी मास्क असून ते इतर देशांना अधिक किंमतीला विकत आहेत. न्यूजवीकला CIAडून तपासणी अहवाल मिळाला आहे. या अहवालाचे नाव आहे 'UN-China: WHO Mindful But Not Beholden to China' आणि CIA च्या दोन अधिका्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

WHO लपवून ठेवली माहिती

या रिपोर्टनुसार, WHOने कोरोनाबाबत जगाला अलर्ट करण्यात उशिर केला. केवळ CIA नाही तर जर्मनच्या गुप्तचर यंत्रणेनं सुध्दा असा दावा केला आहे की चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग स्वत: WHOचे प्रमुख टेड्रॉस अ‍ॅड्नॉमशी संपर्कात होते. जर्मनची गुप्तचर यंत्रणा BND यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिनपिंगच्या सांगण्यावरून कोरोनाच्या प्रसाराची माहिती 15 दिवस लपवून ठेवली. 21 जानेवारी रोजी जिनपिंग आणि टेड्रॉस यांची भेटही झाली होती. तर, 10 जानेवारी रोजी कोरोनाचा प्रसार होत असल्याचे सिद्ध करण्यात आले होते.

6 आठवड्यात लाखो लोकांचा मृत्यू

या अहवालात असेही सांगण्यात आले आहे की चीनच्या दबावाखाली WHO ने दिलेल्या माहितीमुळे युरोप आणि आशिया देशांमधील प्रवास बंदी, लॉकडाऊन व इतर सुरक्षा उपायांना सुमारे 6 आठवडे उशिर झाला. दरम्यान, WHO ने जर्मन एजन्सीचा हा दावा फेटाळला आहे. या तपासणी अहवालात असे म्हटले आहे की जिनपिंग आणि टेड्रॉस यांची भेट 20, 21, 22 जानेवारी रोजी झाली आणि त्यानंतर WHOने संसर्ग रोखण्यासाठी चीनची प्रशंसा केली. 28 जानेवारी रोजी जिनपिंग आणि टेड्रॉसच्या बैठकीनंतर, डब्ल्यूएचओने 30 जानेवारी रोजी कोरोनाला पब्लकी हेल्थ इमर्जन्सी (जागतिक आणीबाणी) म्हणून घोषित केले.

ट्रम्प यांनी चीनशी चर्चा नाकारली

दुसरीकडे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना चीनशी व्यापार कराराबाबत पुन्हा चर्चा करण्यात रस नसल्याचे सांगितले आहे. अमेरिकेने याआधी व्यापार युद्ध चीननं न संपवल्यास त्यांना 'अत्यंत गंभीर परिणाम' भोगावे लागतील असा इशारा दिला होता. हाँगकाँगच्या साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या अहवालाच्या संदर्भात ट्रम्प यांचे हे विधान आले आहे, ज्यात असे म्हटले आहे की, चीनला व्यापार करार अधिक पुनर्प्राप्त करण्याची इच्छा आहे जेणेकरून ते बीजिंगला अनुकूल बनतील.

First published: May 13, 2020, 9:47 AM IST

ताज्या बातम्या