वुहान, 23 एप्रिल : चीनमधील वुहान शहरातील 76 दिवसांच्या लॉकडाऊनंतर लोक आणि तिथली कामाची, अर्थव्यवस्थेची घडी आता कुठे नीट होत आहे. तर दुसरीकडे पुन्हा एकदा कोरोनाचं संकट डोकं वर काढत असल्याचा पाहायला मिळत आहे. धक्कादायक बाब म्हणजे उत्तर पूर्वेकडील हार्बिन शहर हे कोरोनाचं केंद्र होत असल्याचं लक्षात आलं आहे. या जीवघेण्या महासंकटानं जगभरात थैमान घातलं आहे. याची सुरुवात वुहानमधून झाली होती. पावणे दोन लाखहून अधिक लोकांचा या व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. हार्बिन शहर पुन्हा एकदा कोरोनाचं केंद्र स्थान होत असल्याचं लक्षात येताच चीन सरकारनं हे शहर पूर्ण सील केलं आहे. चीनच्या वुहान शहरापासून कोरोनाचा संसर्ग जगभरात पसरला. 76 दिवसांच्या लॉकडाऊनंतर चीननं कोरोनावर नियंत्रण मिळवल्याचा दावा केला होता. याशिवाय त्यांच्याकडे व्हायरसमुळे होणाऱ्या मृत्यूदराचं प्रमाणही कमी आहे असा दावाही करण्यात आला. त्यानंतर लॉकडाऊन उठवण्यात आला होता. आता पुन्हा एकदा हार्बिनमध्ये कोरोनानं मोठ्या प्रमाणात संक्रमणास सुरुवात केली आहे. हे वाचा- भारताने लॉकडाऊन हटवण्याची घाई करू नये, जागतिक तज्ञांचा सल्ला चीनच्या हीलॉन्गजियांग प्रांतात कोरोनाचा वेगानं संसर्ग झाल्यानंतर चीन सरकारने कठोर पावले उचलली आणि अनेक अधिकाऱ्यांनाही शिक्षा केली आहे. त्याला काढून टाकण्यात आले. या भागात विदेशातून आलेले लोको कोरोनाग्रस्त असल्याची माहिती समोर आली. त्यामुळे या भागातील अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात आली. त्यानंतर हार्बिन इथे वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे. तर चीनमधील हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणांमधील नागरिकांना पुन्हा क्वारंटाइन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एका अहवालानुसार मागच्या आठवड्यात 87 वर्षांच्या कोरोनाग्रस्तामुळे 35 लोकांना व्हायरसचा संसर्ग झाला आहे. हार्बिन शहरात मोठ्या प्रमाणात लोक राहतात. सध्या इथल्या शाळा, महाविद्यालयांना सुट्टी असली तरीही कोरोना वेगानं पसरण्याचा धोका आहेच. हीलॉन्गजियांग भागात 537 रुग्ण कोरोनाग्रस्त आढळले आहेत. त्यापैकी 384 रुग्ण हे बाहेरून आले असल्याचा दावा चीन सरकारनं केला आहे. हे वाचा- कोरोनापासून वाचण्यासाठी लॉकडाऊन; घरात बसल्या बसल्या या आजाराने घातला विळखा तर दुसरीकडे वुहानमधील डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांमध्ये पुन्हा कोरोनाची लक्षणं दिसून येत आहे. अशा रुग्णांना वुहानमधील एका इंडस्ट्रियल प्लान्टजवळ तयार केलेल्या क्वारंटाइन हबमध्ये ठेवण्यात आले आहे. यानंतर या नागरिकांचे दोन वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहे. उपचारादरम्यान चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जात आहे. मात्र यापैकी एका रुग्णाला पुन्हा कोरोनाचा संसर्ग झाल्याचा संशय आला होता. तेव्हा त्याची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. मात्र या रुग्णाला कोरोना संसर्ग होऊन 2 महिने झाले आहेत. बरा झालेला रुग्णही पुन्हा कोरोनाबाधित होऊ शकतो या गोष्टीमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. हे वाचा- कोरोनामुळे जेलमधून सुटले तोच ठरला शेवटचा दिवस, गावात येताच दोन्ही भावांचा मर्डर संकलन, संपादन- क्रांती कानेटकर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.