जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / कोरोनामुळे जेलमधून सुटले तोच ठरला शेवटचा दिवस, गावात येताच दोन्ही भावांचा मर्डर

कोरोनामुळे जेलमधून सुटले तोच ठरला शेवटचा दिवस, गावात येताच दोन्ही भावांचा मर्डर

कोरोनामुळे जेलमधून सुटले तोच ठरला शेवटचा दिवस, गावात येताच दोन्ही भावांचा मर्डर

धक्कदायक! गावात येताच गावकऱ्यांनी गाठलं आणि दोन्ही भावांचा जीव जाईपर्यंत त्यांना मारहाण केली.

  • -MIN READ
  • Last Updated :

गुवाहाटी, 23 एप्रिल : आसाममधील कोरोना संसर्गामुळे तुरुंगात असलेल्या दोन भावांना तुरुंगवासापासून मुक्ती मिळाली. परंतु गावात पोहोचल्यावर किरकोळ प्रकरणावरून स्थानिक लोकांशी भांडणं झालं. हे दोन भाऊ गावात येताच वादाला सुरुवात झाली. सुरू झालेला हा शाब्दिक वाद इतका वाढला की, ग्रामस्थांनी या दोन भावांचा हाणामारीत थेट खून केला. ही घटना बुधवारी घडली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दोन्ही भाऊ अनेक गुन्ह्यात होते सहभागी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बकसा जिल्ह्यातील सिमुलगुरी जवळील अतिबरी गावात हा खून करण्यात आला होता. बकसा जिल्ह्यातील एसपी थुब प्रितीक विजय कुमार यांनी सांगितले की, हे खेड्यातील दुश्मनीचे प्रकरण आहे आणि दोन्ही भाऊ या गुन्ह्यात सामील होते. ते म्हणाले की, या प्रकरणात पोलिसांनी काही लोकांना अटक केली आहे आणि बाकीच्यांना अटक करण्यासाठी छापेमारी सुरू आहे. Birthday Special : मुलाचा फोटो शेअर करत कुशल पंजाबीनं केली होती आत्महत्या मृतांची ओळख पटली या घटनेत ठार झालेल्या भावांची ओळख विश्व पोलिसांनी बिश्वजित दास आणि हरधन दास अशी केली आहे. देशात कोरोना संक्रमणामुळे सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारांना काही कैद्यांना काही काळासाठी सोडण्याची सूचना केली होती. जेणेकरून तुरूंगातील कैद्यांची संख्या कमी होईल, तसेच संक्रमणाचा धोकाही कमी होईल. त्यामुळेच या दोन्ही भावांना देखील घरी सोडण्यात आलं होतं. पण बाहेर येताच त्यांची अशा प्रकारे हत्या झाल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. कोरोनापासून वाचण्यासाठी लॉकडाऊन; घरात बसल्या बसल्या या आजाराने घातला विळखा मिळालेल्या माहितीनुसार, हे दोन्ही भाऊ दरोडे व खंडणी प्रकरणात अडकले होते आणि बरेच महिने तुरूंगात होते. तुरूंगातून सुटका झाल्यानंतर हे दोन्ही भाऊ एका नातेवाईकाच्या घरी राहत होते. बुधवारी सकाळी ते आपल्या पूर्वजच्या गावी परत आले. त्या दरम्यान त्यांच्यात आणि गावकऱ्यांमध्ये एका गोष्टीवरून भांडण झाले. हा वाद इतका वाढला की गावकऱ्यांनी त्यांना ठार मारले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्येमागील खरं कारण अद्याप समजू शकलेले नाही. या हत्येबाबत गोबरधन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संपादन - रेणुका धायबर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: corona
  • First Published :
जाहिरात
जाहिरात