Home /News /national /

भारताने लॉकडाऊन हटवण्याची घाई करू नये, जागतिक तज्ञांचा सल्ला

भारताने लॉकडाऊन हटवण्याची घाई करू नये, जागतिक तज्ञांचा सल्ला

भारतात दुसरा लॉकडाऊन 3 मेपर्यंत असणार आहे तो हटवण्याची घाई करू नये असा सल्ला देत एकूण 10 आठवडे लॉकडाऊनची गरज असल्याचं मत जागतिक तज्ञांनी व्यक्त केलं.

    नवी दिल्ली, 22 एप्रिल : कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी भारतात सध्या दुसरा लॉकडाऊन सुरु आहे. सुरुवातीला 14 मार्चपर्यंत 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर देशातली कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेऊन हा लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढवण्यात आला. मात्र जगातील आघाडीचे मेडिकल जर्नल Lancet चे एडिटर इन चीफ रिचर्ड हॉर्टन यांनी एवढा लॉकडाऊन भारताला पुरेसा नसल्याचं म्हटलं आहे. रिचर्ड यांनी म्हटलं की, भारताने लॉकडाऊन हटवण्याची घाई करू नये. एकूण दहा आठवडे लॉकडाऊन करण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं. भारताच्या लॉकडाऊनचा दुसरा टप्पा 3 मे रोजी संपणार आहे. 3 मे रोजी लॉकडाऊन संपल्यानंतर सर्व सुरळीत होईल अशी लोकांना आशा वाटते. मात्र इंडिया टुडे टीव्हीशी बोलताना रिचर्ड यांनी हा लॉकडाऊन हटवण्याची घाई करू नये असा सल्ला दिला आहे. भारतात कमीत कमी दहा आठवडे लॉकडाऊन करण्यावर विचार करायला हवा. कोणत्याही देशातून कोरोना व्हायरस कायमचा नष्ट होणार नाही. तो आपला आपण नष्ट होईल. देशात कोरोनाला रोखण्यासाठी योग्य दिशेनं पावलं टाकली जात आहेत असंही रिचर्ड यांनी सांगितलं. हे वाचा : लॉकडाऊननंतर चीनचे नवे उपद्व्याप! सुरू केली किसिंग स्पर्धा, PHOTO VIRAL देशात जर लॉकडाऊन यशस्वी झाला तर नक्कीच 10 आठवड्यात कोरोना नष्ट होईल. हे झालं तरच इतर गोष्टी सुरळीत होऊन जनजीवन पुर्ववत होईल असंही रिचर्ड म्हणाले. रिचर्ड यांच्या म्हणण्यानुसार जर एकूण 10 आठवड्यांचा लॉकडाऊन करायचा झालाच तर भारतात आणखी महिनाभर लॉकडाऊन वाढवावा लागेल. हे वाचा : अमेरिकेत भारतीय डॉक्टर कोरोनाग्रस्तांसाठी देवदूत, आभारासाठी 100 गाड्यांचा ताफा
    Published by:Suraj Yadav
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या