Home /News /entertainment /

लॉकडाऊनमध्ये अभिनेत्रीच्या घरात दिसलं भूत? VIDEO शेअर करून सांगितलं सत्य

लॉकडाऊनमध्ये अभिनेत्रीच्या घरात दिसलं भूत? VIDEO शेअर करून सांगितलं सत्य

मराठमोळी अभिनेत्री नम्रता शिरोडकरनं तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. जो खूप व्हायरल होत आहे.

  मुंबई, 14 जून : कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण देशभरात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. अर्थात काही दिवसांपूर्वीच यात काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे. मात्र या संपूर्ण काळात बॉलिवूडचे सर्वच सेलिब्रेटी सोशल मीडियावर मात्र खूप सक्रिय आहे. प्रत्येकजण रोज त्यांचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. अशात मराठमोळी अभिनेत्री नम्रता शिरोडकरनं तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात तिनं तिच्या घरात भूत दिसल्याचं म्हटल आहे. हा व्हिडीओ सुरुवातीचे काही सेकंद खूपच भीतीदायक आहे. नम्रता शिरोडकरनं तिच्या इन्स्टाग्रामवर काही दिवसांपूर्वीच एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात तिच्या घरात एक मुलगी दिसत आहे. जिचा चेहरा केसांनी झाकलेला आहे. ती मुलगी हळूहळू चालत पुढे येताना दिसते. या व्हिडीओच्या बॅकग्राऊंडला खूपच भीतीदायक म्यूझिक सुरू आहे. नम्रतानं शेअर केलेला हा व्हिडीओ सर्वांना खूप भीतीदायक वाटत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. लग्नादिवशीच पतीला देशातून बाहेर काढलं, रजिस्टर ऑफिसमध्ये वाट पाहत राहिली गायिका
  या व्हिडीओमध्ये ती मुलगी चालत पुढे येते आणि अचानक केस बाजूला करते. तेव्हा समजतं की, ती नम्रता आणि महेश बाबू यांची लाडकी लेक सितारा आहे. हा व्हिडीओ शेअर करताना नम्रतानं लिहिलं, घरात Conjuring…Voila ही तर माझी मुलगी आहे. नम्रतानं या व्हिडीओमध्ये सिताराची तुलना Conjuring सिनेमाशी केली असली तरी हा व्हिडीओ खूपच विनोदी आहे. या व्हिडीओतूनच समजतं की सिताराचं अभिनय कौशल्य किती चांगलं आहे. नम्रता शिरोडकर आणि महेश बाबू या लॉकडाऊनच्या काळात आपल्या हैदराबादच्या घरी आहेत आणि लॉकडाऊनच्या नियमांचं पालन करत आहेत. पण या दरम्यानं हे दोघंही सोशल मीडियावर खूपच सक्रिय आहेत. विवाहित असूनही प्रेमात पडली अभिनेत्री, पहिल्या पतीशी घटस्फोट घेत केलं दुसरं लग्न
  Published by:Megha Jethe
  First published:

  Tags: Bollywood

  पुढील बातम्या